अमेरिकेने संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत हमासने इस्रायलवर केलेल्या हल्ल्याचा निषेध करणारा प्रस्ताव सादर केला. मात्र, संयुक्त अरब अमिरातीसह रशिया आणि चीनने अमेरिकेच्या या प्रस्तावाविरोधात मतदान केलं. यानंतर इस्रायलच्या संयुक्त राष्ट्रातील राजदुताने रशिया आणि चीनला फटकारलं. “तुमच्या देशावर असा हल्ला झाला असता, तर तुम्ही यापेक्षा अधिक शक्तीने प्रत्युत्तर दिलं असतं,” असं मत इस्रायलने व्यक्त केलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

इ्स्रायलच्या राजदुताने म्हटलं, “आम्ही इस्रायलमध्ये आमच्या अस्तित्वाची लढाई लढत आहोत. तुमच्यापैकी कोणत्याही देशात असं हत्याकांड झालं असतं, तर मला खात्री आहे की, तुम्ही इस्रायलपेक्षा अधिक ताकदीने प्रत्युत्तर दिलं असतं.”

“…तुमच्या मनात कोणतीही शंका असायला नको”

“त्यांनी अत्यंत अमानवीय कृत्य केलं आहे. असे अत्याचार पुन्हा होऊ नये म्हणून या दहशतवाद्यांविरोधात कठोर सैन्य कारवाई व्हायला हवी याबाबत तुमच्या मनात कोणतीही शंका असायला नको,” असंही इस्रायलने नमूद केलं.

हेही वाचा : “हमास दहशतवादी संघटना नाही”, तुर्कीच्या राष्ट्राध्यक्षांचं विधान; म्हणाले, “आपल्या भूमीचे रक्षण…”

अमेरिकेच्या प्रस्तावात नेमकं काय?

अमेरिकेने संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा परिषदेत सादर केलेल्या प्रस्तावात पॅलेस्टिनी कट्टरतावादी संघटना हमासने केलेल्या हल्ल्याचा निषेध केला. तसेच बंदी करण्यात आलेल्या नागरिकांची सुटका आणि आंतरराष्ट्रीय मानवाधिकार कायद्याच्या पालनाची मागणी केली. या प्रस्तावाला १० देशांनी पाठिंबा दिला. मात्र, संयुक्त अरब अमिरातीसह रशिया आणि चीनने अमेरिकेच्या या प्रस्तावाविरोधात मतदान केलं.