जेरुसलेममध्ये मोठय़ा प्रमाणात हिंसाचार
पॅलेस्टाइनकडून करण्यात आलेल्या सशस्त्र हल्ल्यांमुळे इस्रायलमध्ये अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. या हल्ल्यामुळे जेरुसलेममध्ये मोठय़ा प्रमाणात हिंसाचार घडला.
जेरुसलेममधील पवित्र धार्मिक स्थळांवरून इस्रायल पोलिसांनी एका मुस्लीम तरुणाला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. तसेच, घटनास्थळावर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. अल अकसा मशिदीत महिलांच्या प्रवेशद्वारातून प्रवेश करणाऱ्या ४५ वर्षीय व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आहे, अशी माहिती प्रवक्त्या लुबा सामरी यांनी दिली.
पोलिसांवरच हल्ले
प्रार्थनास्थळांवर शांतता राखण्यासाठी प्रत्येक प्रवेशद्वारावर वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. हिंसाचारात पॅलेस्टाइनच्या तरुणांचा समावेश होता. पोलिसांनी अतिदक्षतेचा इशारा दिला आहे. धार्मिक स्थळांवर अद्यापही अशांततेचे वातावरण असून पॅलेस्टिनियन तरुणांनी मशिदीचा ताबा घेत पोलिसांवर हल्ला सुरूच ठेवला आहे. पोलिसांवर हल्ला करण्यासाठी त्यांनी दगड आणि हातबॉम्बचा वापर केला आहे.

Story img Loader