इस्रायलने बुधवारी (१ नोव्हेंबर) नवी दिल्लीत भारतीय पत्रकारांसाठी इस्रायलच्या दुतावासात एका बैठकीचं आयोजन केलं. यात काही व्हिडीओ दाखवत ७ ऑक्टोबरला गाझातील हमासच्या २००० दहशतवाद्यांनी कशाप्रकारे इस्रायलमध्ये प्रवेश करत इस्रायलवरचा आतापर्यंतचा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला केला, हे दाखवण्यात आलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

इस्रायलने पत्रकारांना दाखवलेल्या व्हिडीओत सैनिकांच्या शरीरावर लावलेल्या कॅमेरांचे फुटेज, गो प्रो व्हिडीओ, सीसीटीव्ही, डॅशबोर्ड कॅमेरा आणि हमास व पीडित नागरिकांच्या मोबाईलवर शुट करण्यात आलेल्या फुटेजचा समावेश होता.

“तुझ्या मुलाने आज अनेक ज्यु लोकांना मारलं आहे”

यातील एका फुटेजमध्ये हमासचे दहशतवादी म्हणत आहेत की, व्हॉट्सअॅप सुरू करून आतापर्यंत किती लोक मारले गेले हे पाहा. या दहशतवाद्याने आपल्या घरच्यांना ज्यु लोकांवरील हल्ल्याचे फोटो आणि व्हिडीओही शेअर केले. तसेच तुझ्या मुलाने आज अनेक ज्यु लोकांना मारलं आहे. आई, तुझा मुलगा हिरो आहे, असंही म्हटलं.

“समोरून जाणाऱ्या कुत्र्यावर अनेक गोळ्या झाडल्या”

एका व्हिडीओत हमासचे दहशतवादी समोरून जाणाऱ्या कुत्र्यावर अनेक गोळ्या झाडतानाही दाखवण्यात आलं. तसेच रुग्णवाहिकेच्या टायरवर गोळ्या झाडून रुग्णवाहिका निकामी केल्याचंही या व्हिडीओत दाखवण्यात आलं.

हेही वाचा : इस्रायल-हमास संघर्ष लोकांना नको असला तरी नेत्यांना हवा आहे का?

जगभरातील एकूण १५ देशांमध्ये अशाप्रकारचे व्हिडीओ दाखवणार

इस्रायल जगभरातील एकूण १५ देशांमध्ये अशाप्रकारचे व्हिडीओ दाखवणार आहे. ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकेत याआधीच हे व्हिडीओ दाखवण्यात आले आहेत. गुरुवारी (२ नोव्हेंबर) फ्रान्समध्ये या व्हिडीओंचे स्क्रिनिंग होणार आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Israel embassy reveals videos of hamas attack on october 7 pbs
Show comments