Israel – Palestine News in Marathi : इस्रायलमध्ये शनिवारी (७ ऑक्टोबर) पॅलेस्टाईनमधील दहशतवादी संघटना हमासने हजारो क्षेपणास्त्र डागून हल्ला चढवला. बेसावध असलेल्या इस्रायलसाठी हा सर्वांत मोठा धक्का होता. परिणामी अनेक इस्रायली नागरिक पहिल्याच हल्ल्यात मारले गेले. दरम्यान, हमासची दहशत वाढत असल्याचं पाहून इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी युद्धाची घोषणा केली. तेव्हापासून दोन्ही देशांमध्ये युद्ध सुरू झाले असून या युद्धभूमीवर अनेकांचे प्राण गेले आहेत. दरम्यान, ही युद्ध परिस्थिती हाताळण्यासाठी इस्रायलने मोठा निर्णय घेतला आहे. महत्त्वाचं म्हणजे, या निर्णयात त्यांना विरोधकांची खंबीर साथ लाभली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू आणि विरोधी पक्षनेते बेनी गॅंट्झ यांनी हमासच्या दहशतवाद्यांविरोधात लढण्यासाठी आपत्कालीन एकता सरकार स्थापन केले आहे. तसंच युद्ध मंत्रिमंडळ स्थापन करण्यासही सहमती दर्शविली आहे. त्यात नेतन्याहू, गॅंट्झ, विद्यमान संरक्षण मंत्री योव गॅलंट आणि निरीक्षक सदस्य म्हणून काम करणारे इतर दोन उच्च अधिकारी असणार आहेत. जोपर्यंत लढाई सुरू आहे तोपर्यंत युद्धाशी संबंधित नसलेले कोणतेही कायदे किंवा निर्णय सरकार पारित करणार नाही. तसंच, लेबनॉनमधून इस्रायली हवाई हद्दीत संशयास्पद घुसखोरी झाल्याचंही वृत्त समोर आलं आहे.

हेही वाचा >> “भारताने पॅलेस्टाईनलाही पाठिंबा दिला पाहिजे कारण..”, काँग्रेस खासदार शशी थरुर यांचं वक्तव्य

गाझा पट्टीवरील वीज सेवा खंडीत

दरम्यान, इंधन संपल्याने पॅलेस्टाईन एन्क्लेव्ह येथे असलेला एकमेव वीज प्रकल्प बंद करण्यात आल्याची माहिती पॅलेस्टाईनने दिली आहे. पॅलेस्टाईनचा हा एकमेव वीज प्रकल्प आहे. यामुळे गाझा पट्टीवरील वीजसेवा खंडीत झाली आहे. दरम्यान, येथे जनटरेटची व्यवस्था करण्यात आली आहे. परंतु, त्यासाठीही इंधनाची गरज लागते. हमासच्या हल्ल्यानंतर, इस्रायलने गाझा पट्टीवर अन्न, पाणी, इंधनासाठी नाकाबंदी केली होती.

तर, आतापर्यंत ११०० पॅलेस्टाईनी नागरिकांचा मृत्यू झाला असल्याची माहिती पॅलेस्टाईन आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. तर, ५ हजार ३३९ नागरिक जखमी झाले आहेत.

हमास संघटना ISIS पेक्षा वाईट

दरम्यान, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी तिसऱ्यांदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्याशी संवाद साधला आहे. हमास संघटना ISIS पेक्षा वाईट असून त्यांच्याशी तशाच पद्धतीने वागलं पाहिजे, असं नेतन्याहू यांनी बायडन यांना सांगितलं आहे. अमेरिका इस्रायलच्या पाठीशी असून स्वतःचे संरक्षण करण्याच्या अधिकाराचे अमेरिकेने समर्थन केले आहे.