Israel Hamas Ceasefire news Latest Update : गेल्या १५ महिन्यांपासून इस्रायल व हमासमधील युद्धामुळे मध्य-पूर्व आशियात प्रचंड तणावाचं वातावरण आहे. सुरुवातीला अनेक देशांनी हे युद्ध थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यात कोणत्याही देशाला अथवा नेत्याला यश मिळालं नाही. दुसऱ्या बाजूला इराण, लेबनान, हेझबोला (लेबनानमधील दहशतवादी संघटना) व सीरियासारख्या देशांनी या युद्धात उडी घेतल्यामुळे या युद्धाची व्यापकता व दाहकता आणखी वाढली. यामुळे संपूर्ण आशिया खंडात तणाव निर्माण झाला. अखेर आता हे युद्ध थांबेल असं दिसतंय. हे युद्ध थांबवण्यासाठी व हमासने ओलीस ठेवलेल्या इस्रायली नागरिकांच्या सुटकेच्या बदल्यात इस्रायलच्या तुरुंगात असलेल्या पॅलेस्टिनी कैद्यांच्या सुटकेसंबंधीच्या सामंजस्य कराराचा मसुदा तयार करण्यात आला आहे. दरम्यान, इस्रायलच्या संरक्षण विभागाने या सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे. इस्रायलच्या पंतप्रधान कार्यालयाने शुक्रवारी सकाळी याबाबतची माहिती दिली आहे. तसेच पंतप्रधान कार्यालयाने म्हटलं आहे की इस्रायली सुरक्षा मंत्रिमंडळाने ओलिसांची सुटका आणि हमाससह युद्धविरामाच्या करारास मान्यता दिली आहे. तसेच सरकारला हा करार स्वीकारण्याचा सल्ला दिला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा