जेरुसलेम
इस्रायल आणि हमासदरम्यान सुरू झालेल्या युद्धाला दोन आठवडे होत असताना, इस्रायलने शुक्रवारी पहाटे गाझापट्टीमध्ये बॉम्बवर्षांव केला. ज्या भागामध्ये पॅलेस्टिनींना आश्रय घेण्यास सांगण्यात आले होते, त्याच भागाला इस्रायली सैन्याने लक्ष्य केले. संयुक्त राष्ट्रांचे सेक्रेटरी जनरल अँटोनियो गुटेरेस यांनी राफा सीमेला भेट देऊन मदतसामग्री लवकरात लवकर गाझामध्ये पोहोचावी असे आवाहन केले.
दुसरीकडे, इस्रायलने गाझा आणि लेबनॉनच्या सीमाभागातील आपल्या नागरिकांना तेथून हलवले असून त्यांना अन्यत्र वेगवेगळय़ा हॉटेलमध्ये ठेवले आहे. किर्यात शामोना हे २० हजारांची वस्ती असलेले गाव रिकामे करण्याचा आदेश संरक्षण मंत्रालयाने दिला. इस्रायलने शुक्रवारी पहाटे जोरदार बॉम्बवर्षांव केला. आपण हमासशी संबंधित १००पेक्षा जास्त ठिकाणांवर हल्ला केल्याचे इस्रायलच्या लष्कराने सांगितले.
हेही वाचा >>> Israel-Hamas युद्धात अमेरिकेपाठोपाठ रशियाची उडी, ओलिसांबाबत मॉस्कोची हमासशी चर्चा
स्थलांतरित परतण्याचा धोका
इस्रायलने उत्तर गाझा रिकामे करण्याचा आदेश दिल्यानंतर गाझामध्ये आतापर्यंत १० लाखांपेक्षा जास्त लोकांनी स्थलांतर केले असून ते सर्वजण दक्षिण भागात गेले. दक्षिण गाझा सुरक्षित असल्याचे इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांनी सांगतिले होते, पण गाझामध्ये कोणतीही जागा सुरक्षित नाही असे इस्रायली लष्कराचे प्रवक्ते नीर दिनार यांनी शुक्रवारी स्पष्ट केले. दक्षिण गाझामध्येही इस्रायलचे हवाई हल्ले सुरू असल्याने आता तिथे गेलेले स्थलांतरित पुन्हा एकदा उत्तर भागात परततील अशी भीती संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार कार्यालयाच्या प्रवक्त्या रविना शामदासानी यांनी व्यक्त केली.
रुग्णालयांसमोरील संकट अधिक गडद
रुग्णालयांमधील वैद्यकीय सामग्री आणि जनरेटरसाठी आवश्यक असलेले इंधन काही तासांमध्ये संपेल अशी शक्यता आहे. त्यांचा वापर जपून केला जात आहे. डॉक्टरांवर फोनच्या प्रकाशात शस्त्रक्रिया करण्याची आणि जखमा धुण्यासाठी व्हिनेगरचा वापर करण्याची वेळ आली आहे.
मदतसामग्रीला परवानगी नाहीच
गाझा आणि इजिप्तच्या राफा सीमेवर २०० ट्रकमधून तीन हजार टन मदतसामग्री गाझा पट्टीत जाण्याची परवानगी मिळण्याच्या प्रतीक्षेत पडून आहे. गाझामध्ये ही मदतसामग्री जाऊ देण्यास इस्रायलने अद्याप परवानगी दिलेली नाही. आलेली मदतसामग्री सामान्य पॅलेस्टिनी नागरिकांनाच मिळेल, हमासच्या ताब्यात जाणार नाही याची हमी इस्रायलला हवी आहे.
पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ
निदर्शने शुक्रवारच्या प्रार्थनेनंतर अरबी देशांसह इंडोनेशिया, दक्षिण कोरिया या देशांमध्ये पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ निदर्शने करण्यात आली. निदर्शकांनी इस्रायलबरोबरच अमेरिकेविरोधातही घोषणाबाजी केली. पॅलेस्टाईनला वाचवा अशी मागणी करणारे, तसेच नेतान्याहू व बायडेन यांच्यावर टीका करणारे फलक निदर्शकांनी हाती धरले होते.