पॅलेस्टाईनमधील दहशतवादी संघटना हमास आणि इस्रायलमध्ये गेल्या १८ दिवसांपासून युद्ध चालू आहे. ७ ऑक्टोबर रोजी हमासने इस्रायलवर हल्ला करून २०० हून अधिक इस्रायली नागरिकांचं अपहरण केलं. संबंधित सर्वांना हमासने गाझा पट्टीत नेत ओलीस ठेवलं आहे. यातील दोन महिलांची हमासने सोमवारी सुटका केली. यातील एका महिलेनं प्रसारमाध्यमांशी संवाद साधला असून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘रॉयटर्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, योचेव्हड लिफशिट्झ असं या ८५ वर्षीय ओलीस ठेवलेल्या इस्रायली महिलेचं नाव आहे. अपहरणापासून सुटकेपर्यंतचा घटनाक्रम सांगताना लिफशिट्झ म्हणाल्या की, ७ ऑक्टोबर रोजी हमासच्या दहशतवाद्यांनी माझं अपहरण केल्यानंतर ते मला गाझामध्ये घेऊन गेले. मात्र, दोन आठवड्यांच्या बंदिवासात त्यांनी माझी चांगल्याप्रकारे काळजी घेतली. त्यांनी मला एकदा गाझामधील बोगद्यात घेऊन गेले, एखाद्या कोळ्याच्या जाळ्याप्रमाणे ते ठिकाण होते. पण तिथेही हमासचे दहशतवादी माझ्याशी चांगले वागले.

हेही वाचा- हमासकडून दोन वृद्ध इस्रायली महिलांची सुटका, २२० नागरिक अजूनही सुटकेच्या प्रतीक्षेत

८५ वर्षीय लिफशिट्झ यांनी पुढे सांगितलं की, त्यांना गाझामधील बोगद्यामध्ये घेऊन गेल्यानंतर तेथील एका डॉक्टरने त्यांची तपासणी केली. तसेच त्यांच्या सर्व गरजा पूर्ण केल्या. हमासचे दहशतवादीही आमच्याशी सौम्य वागले आणि आमची योग्य प्रकारे काळजी घेतली.

हेही वाचा- रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना हृदयविकाराचा झटका, प्रकृतीबाबत मोठी अपडेट

“मी नरकातून परत आले आहे. अशा परिस्थितीत आम्ही अडकू याची आम्हाला थोडीशीही कल्पना नव्हती,” असंही ओलीस महिलेनं म्हटलं. लिफशिट्झ यांनी सांगितलं की, हमासच्या दशतवाद्यांनी किबुट्झमधून त्यांचं अपहरण केलं आणि मोटारसायकलवर बसवून गाझामध्ये नेलं. दुचाकीवरून जाताना माझं डोकं एका बाजूला आणि माझं शरीर दुसऱ्या बाजूला होतं. हमासच्या दहशतवाद्यांनी मला वाटेत मारहाण केली. यामुळे मला वेदना होत होत्या आणि श्वास घ्यायलाही त्रास होत होता, असंही पीडित महिलेनं सांगितलं.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Israel hamas war freed hostage woman recounts horror of captivity rmm