Hamas Terrorist Killed 10 Jews Call Recording: इस्रायल आणि हमास यांच्यात मागच्या दोन आठवड्यांपासून युद्ध चालू आहे. हमासकडून सातत्याने इस्रायलवर हल्ले चालू आहेत. इस्रायलच्या परराष्ट्र मंत्रालयाने त्यांच्या X अकाऊंटवर एक फोन कॉलचा ऑडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये हमासचा दहशतवादी त्याच्या वडिलांना १० ज्यू लोकांची हत्या केल्याचं सांगतो आहे. या ऑडिओ कॉलची सोशल मीडियावर चर्चा सुरु झाली आहे.

काय आहे या ऑडिओमध्ये?

हमासचा दहशतवादी असलेला महमूद हा त्याच्या वडिलांना सांगतो आहे की मी आत्ता माझ्या हाताने १० ज्यू लोकांची हत्या केली. याबाबत हा दावा केला जातो आहे की हा ऑडिओ ७ ऑक्टोबरचा आहे. तसंच हे देखील सांगितलं जातं आहे की या दहशतवाद्याने वडिलांना जो फोन केला त्यासाठी हत्या केलेल्या ज्यू महिलेचाच मोबाईल वापरला होता. या महिलेचा मृतदेह इस्रायलच्या लष्कराने नंतर ताब्यात घेतला.

इस्रायलच्या परराष्ट्र मंत्रालयाने हा ऑडिओ पोस्ट केला आहे. त्यात हमासचा दहशतवादी महमूद हा त्याच्या वडिलांना आपण दहा ज्यूंची हत्या कशी केली ते सांगतो आहे.

नेमका काय संवाद आहे हा?

महमूद : हॅलो डॅड.. मी मेफल्सिमच्या आतमध्ये आहे. तुम्ही Whats App बघा मी १० लोकांना ठार केलं आहे. तुमच्या मुलाने १० ज्यू लोकांना संपवलं.

वडील : अल्ला हू अकबर.. खुदा तुझं रक्षण करो.

महमूद : तुम्हाला जो व्हिडीओ आणि फोटो मी पाठवला आहे तो मेफल्सिमच्या आतला आहे. मी एका ज्यू महिलेच्या फोनवरुन तुमच्याशी बोलतो आहे. आत्ताच मी तिला आणि तिच्या पतीला ठार केलं. डॅड मी दहा ज्यूंची हत्या केली.

वडील : अल्हा हू अकबर.

महमूद : What’s App पाहा आणि बघा तुमच्या मुलाने किती ज्यूंना मारलं. मी तुम्हाला व्हॉट्स अॅप कॉल करतो.

वडील : अल्ला हू अकबर

आई : बेटा खुदा तुझं रक्षण करो

महमूद : मी एकट्याने १० लोकांची हत्या केली.

वडील : अल्लाह तुला सुरक्षितपणे घरी पोहचवेल याची खात्री वाटते

महमूद : तुम्ही व्हॉट्स अॅपवर या मला तुमच्याशी बोलायचं आहे.

आई : आज मी तुझ्याबरोबर तिथे असायला हवं होतं

महमूद : अम्मी तुझा मुलगा हिरो आहे. मी अल्लाहच्या मदतीने इथे आलो आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

७ ऑक्टोबरचा हा कॉल आहे असं सांगितलं जातं आहे. या दिवशी हमासने गाझा पट्टीवरुन इस्रायलवर ५ हजारांपेक्षा जास्त रॉकेट हल्ले केल होते. त्यानंतर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी हमासविरोधात युद्धाची घोषणा केली. या घोषणेनंतर मागचे दोन आठवडे हे युद्ध चालू आहे.