एपी, वेस्ट बँक
इस्रायलने बुधवारी वेस्ट बँकमध्ये मोठ्या प्रमाणावर लष्करी कारवाई सुरू केली. जेनिन या संवेदनशील शहराला सैन्याने वेढले आहे. इस्रायलच्या हल्ल्यात किमान नऊ पॅलेस्टिनी ठार झाले आहेत, अशी माहिती पॅलेस्टिनी अधिकाऱ्यांनी दिली. ७ ऑक्टोबर रोजी हमासच्या हल्ल्यानंतर इस्रायलने वेस्ट बँकवर जवळपास दररोज हल्ले सुरूच ठेवले आहेत.

इस्रायली लष्कराचे प्रवक्ते लेफ्टनंट कर्नल नदाव शोशानी यांनी सांगितले की, सैन्याने दहशतवाद्यांचा गड असलेल्या जेनिन या असुरक्षित शहरात प्रवेश केला. तुलकरीम शहर आणि अल-फारा निर्वासित कॅम्पमध्येही सैनिक घुसले. यावेळी करण्यात आलेल्या हल्ल्यात मारले गेलेले सर्व नऊ जण दहशतवादी आहेत. यापैकी तीन तुलकरीममधील तर चार अल-फारा येथील हवाई हल्ल्यात ठार झाले. तसेच अन्य पाच संशयित दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे.

Hamas-Israel armistice in Gaza after 15 months of intense war
हमास-इस्रायल दरम्यान गाझात युद्धविराम… पश्चिम आशियात आता तरी शांतता नांदेल?
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
israel hamas agree to ceasefire conflict in gaza to end after 15 months
इस्रायल-हमास युद्धविरामास सहमती; १५ महिन्यांनंतर गाझामधील संघर्ष थांबणार
Israel Hamas War reuters
इस्रायल-हमासमधील युद्ध आज थांबणार? कतारचे मध्यस्थीचे प्रयत्न; युद्धबंदीसाठी प्रस्ताव
Nashik Rural Local Crime Branch arrested burglary and loot gang
हरसूल, त्र्यंबकेश्वर भागात घरफोडी करणारी टोळी ताब्यात
Amit Shah Slams Uddhav Thackeray
Amit Shah : अमित शाह यांची टीका, “सत्तेसाठी गद्दारी करणाऱ्या उद्धव ठाकरेंना महाराष्ट्राच्या जनतेने…”
Supreme Court order regarding the dispute over a private well near the entrance of Sambhal Jama Masjid
संभलमधील स्थिती ‘जैसे थे’, न्यायालयाचा आदेश; विहिरीबाबत कार्यवाही करण्यास मज्जाव
pune municipal corporation will take action against banners
पिंपरी : फलकांद्वारे शहर विद्रूप केल्यास आता दंडात्मक कारवाई, महापालिका आयुक्तांचा आदेश; प्रभागनिहाय नागरिकांची समिती

हेही वाचा : औद्योगिक स्मार्ट शहरांमध्ये राज्यातील दिघीचा समावेश, केंद्रीय मंत्रिमंडळाच्या निर्णयाने रोजगाराला चालना

पॅलेस्टिनी दहशतवादी गटांनी सांगितले की, इस्रायली सैन्यासोबत त्यांची चकमक सुरूच आहे. जेनिनचे गव्हर्नर कमल अबू अल-रब यांनी पॅलेस्टिनी रेडिओला सांगितले की इस्रायली सैन्याने शहराला वेढा घातला आहे, बाहेर पडण्याचे आणि प्रवेशाचे मार्ग बंद केले असून छावणीतील पायाभूत सुविधा उद्ध्वस्त केल्या आहेत.

वेस्ट बँकमधील पॅलेस्टिनी आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, इस्रायली सैन्याने रुग्णालयाकडे जाणारे रस्ते रोखले आहेत आणि जेनिनमधील इतर वैद्याकीय केंद्रांना घेरले आहे. दहशतवाद्यांना रुग्णालयांमध्ये आश्रय घेण्यापासून रोखण्यासाठी लष्कर प्रयत्नशील असल्याचे शोशानी यांनी सांगितले.

दरम्यान, पॅलेस्टिनी प्राधिकरणाचे अध्यक्ष महमूद अब्बास यांचे प्रवक्ते नबिल अबू रुदेनेह यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे. त्याचवेळी अमेरिकेने हस्तक्षेप करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे, असे वृत्त पॅलेस्टाईनच्या अधिकृत वृत्तसंस्थेने दिले आहे. पॅलेस्टिनी आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, गाझामधील युद्ध १० महिन्यांपूर्वी सुरू झाल्यापासून इस्रायली सैन्याने वेस्ट बँकमध्ये ६०० हून अधिक पॅलेस्टिनींना ठार केले आहे. हमास आणि इतर दहशतवादी गटांचा खात्मा करण्यासाठी आणि इस्रायलवरील हल्ले थांबवण्यासाठी या मोहिमेची गरज असल्याचे इस्रायलचे म्हणणे आहे.

हेही वाचा : बलात्काऱ्यांना फाशीच्या शिक्षेची तरतूद – ममता बॅनर्जी; ‘लवकरच कायद्यात सुधारणा’

पॅलेस्टिनी आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, बुधवारी पहाटे सात जणांचा मृत्यू झाला आहे. जेनिनमधील हल्ल्यात ठार झालेल्यांची ओळख पटली असून कासिम जबरीन (२५) आणि असीम बलुत (३९) अशी दोघांची नावे आहेत. इस्रायलने १९६७ च्या युद्धात वेस्ट बँक, गाझा आणि पूर्व जेरुसलेम ताब्यात घेतले. पॅलेस्टिनींना भविष्यातील राज्यासाठी या तीन जागा परत हव्या आहेत. इस्रायलने वेस्ट बँकमध्ये शेकडो वसाहती बांधल्या आहेत, जिथे पाच लाखाहून अधिक ज्यू राहतात. त्यांच्याकडे इस्रायलचे नागरिकत्व आहे, तर वेस्ट बँकमधील तीन दशलक्ष पॅलेस्टिनी इस्रायली लष्करी राजवटीत राहत आहेत.

Story img Loader