Israel-Hamas War Reuven Azar India’s Stand : इस्रायलचे भारतातील नवनियुक्त राजदूत रुवेन अझर यांनी उभय देशांचे संबंध, इस्रायल – हमास युद्ध, या युद्धातील भारताची भूमिका यावर भाष्य केलं आहे. ते म्हणाले, “गाझात चालू असलेलं युद्ध थांबवण्यासाठी भारताने त्यात किती सहभागी व्हायचे ते भारताला ठरवावं लागेल”. गाझा पट्टीतलं युद्ध थांबवण्यासाठी भारताच्या संभाव्य भूमिकेबद्दल ते म्हणाले, मला वाटतं की भारताने आता निर्णय घायला हवा. ते या युद्धात किती सहभागी होऊ इच्छितात त्याचा निर्णय भारतावरच अवलंबून आहे. अलीकडच्या काळात पश्चिम आशियामध्ये भारताच्या भूमिकेचं महत्त्व वाढलं आहे. भारतही अनेक मुद्द्यावर सक्रीय भूमिका घेत आहे. त्यामुळे भारत त्यांच्या भूमिकेद्वारे या प्रदेशात स्थिरता आणि समृद्धी आणू शकतो.
दरम्यान, “गाझामध्ये चालू असलेल्या युद्धाबाबत रुवेन म्हणाले, भारताने या युद्धाबाबत काय निर्णय घ्यायचा तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. कुठपर्यंत या युद्धात सहभागी व्हायचं ते त्यांचं नेतृत्व ठरवेल. पश्चिम आशियात त्यांच्या भूमिकेला महत्त्व मिळू लागलं आहे. भारत त्यांच्या भूमिकेद्वरे आमच्या भागात (पश्चिम आशिया) स्थिरता आणि समृद्धी आणू शकतो”.
हे ही वाचा >> “आम्ही भारतात जिवंत परत येऊ असं वाटलं नव्हतं”; रशिया-युक्रेन युद्धात लढलेल्या कर्नाटकच्या तिघांनी सांगितली आपबीती!
इस्रायलचे भारतातील नवनियुक्त राजदूत रुवेन अझर काय म्हणाले?
दी इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत रुवेन अझर म्हणाले, इस्रायलला हे युद्ध थांबवायचं आहे. आम्ही आमच्यासमोरच्या चिंता जवळच्या मित्रांसमोर व्यक्त करत आहोत. त्यांचं म्हणणं देखील ऐकत आहोत. भारत आमचा जवळचा मित्र आहे. भारत आमच्या स्वंसरक्षणाच्या अधिकाराचं रक्षण करतोय. आम्हाला कल्पना आहे की अमेरिकेप्रमाणे, इस्रायलच्या इतर मित्रांप्रमाणे भारतही हे युद्ध थांबवू इच्छितो. माझ्यावर विश्वास ठेवा, आम्हालाही ये युद्ध थांबवायचं आहे. त्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न करण्याची आमची तयारी आहे आणि आम्हाला ते करायला आवडेल.
हे ही वाचा >> Faridabad : Video : पाण्याचा अंदाज न आल्याने गाडी पाण्यात घातली अन् घडली दुर्दैवी घटना; बँकेच्या मनेजरसह एकाचा बुडून मृत्यू
इस्रायलमध्ये मेट्रो प्रकल्प उभारणीसाठी भारताकडून मदतीची अपेक्षा
रुवेन अझर म्हणाले, आम्हाला तेल अवीवमध्ये १०० किलोमीटर लांबीची मेट्रो सेवा सुरू करायची आहे. त्यासाठी आम्ही आंतरराष्ट्रीय कंपन्यांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहोत. ज्या कंपन्या कमी खर्चात उत्तम दर्जाची मेट्रो निर्माण करू शकतात अशा कंपन्यांकडे आमचं लक्ष आहे. भारताकडे ही क्षमता आहे. भारत अनेक वर्षांपासून वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आमचा भागीदार राहिला आहे. भारतात रस्ते, विमानतळं, बंदरांशिवाय हजारो किलोमीटरच्या मेट्रो प्रकल्पांवर काम केलं जात आहे.