Israel-Hezbollah War: लेबनॉनची राजधानी बेरूतवर इस्रायलने २७ सप्टेंबर रोजी केलेल्या हवाई हल्ल्यात हिजबुल या दहशतवादी संघटनेचा प्रमुख हसन नसरल्लाहचा मृत्यू झाला. हसन नसरल्लाह इस्रायलच्या सर्वांत मोठ्या शत्रूंपैकी एक होता. तो बऱ्याच काळापासून आपली ठिकाणे बदलत राहून स्वतःला सुरक्षित ठेवत होता. मात्र, इस्रायलने त्याला ठार केले. यानंतर आता इस्रायलने एक मोठा खुलासा केला आहे. हसन नसरल्लाह ज्या बंकरमध्ये राहायचा त्या गुप्त बंकरमध्ये ५०० दशलक्ष डॉलर्सचे सोने आणि रोख रक्कम सापडल्याचा दावा इस्रायलकडून करण्यात आला आहे.

लेबनॉनमधील एका हॉस्पिटलच्या खाली एक गुप्त बंकर आहे. त्यामध्ये ५०० दशलक्ष डॉलर्सपेक्षा जास्त किमतीचे सोने आणि रोख रक्कम आहे, अशी माहिती इस्रायल डिफेन्स दिली आहे. याबाबतचा एक व्हिडीओही आयडीएफने एक्सवर (ट्विटर) शेअर केला आहे. इस्रायली लष्कर आयडीएफच्या म्हणण्यानुसार, लेबनॉनमधील एका हॉस्पिटलखाली मोठे बंकर आहे. तो बंकर हसन नसराल्लाहचा होता. त्या ठिकाणी कोट्यवधी रुपयांचे सोने आणि रोकड ठेवण्यात आलेली आहे.

lawrence bishnoi munawar faruque murder plan
“मला गोदारनं फोन करून मुनव्वर फारूकीच्या हत्येची सुपारी दिली”, मारेकऱ्यानं चौकशीत केलं कबूल; यूकेमध्ये रचला हत्येचा कट!
Daily Horoscope 21st October 2024 Rashibhavishya in Marathi
२१ ऑक्टोबर पंचांग: मेष, सिंहसह ‘या’ राशींची इच्छापूर्ती…
Mahalaxmi murder case
“जर मी तिला मारले नसते तर तिनं…”, फ्रिज हत्याकांडात मृत आरोपीच्या सुसाईड नोटमधून धक्कादायक खुलासा
explosion that caused injuries and destroyed vehicles at outside the Karachi airport, Pakistan,
Blast in Pakistan : हल्ला की अपघात? पाकिस्तानच्या कराचीतील स्फोटात चिनी कामगारांचा मृत्यू; चीनच्या निवेदनात रोख कोणावर?
Israel-Iran war fact check video Tel Aviv bus fire
इस्त्राइलची राजधानी तेल अवीवमध्ये मोठा विध्वंस! अनेक बसेस आगीच्या भक्षस्थानी; Viral Video खरंच युद्धादरम्यानचा आहे का? वाचा सत्य
Iran Israel Conflict
“बिन्यामिन नेतान्याहू २१ व्या शतकातील हिटलर”, इराणच्या भारतीय राजदूतांची टीका; भारताकडे मागितली मदत!
Crude Oil price hike
इराणच्या इस्रायलवरील हल्ल्यानंतर कच्च्या तेलाच्या किंमतीत ३ टक्क्यांनी वाढ; भारतातही पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार?
Israeli attacks hitting all areas of Lebanon
हेजबोलाचा आणखी एक नेता ठार; इस्रायलचे लेबनॉनवरील हल्ले सुरूच

हेही वाचा : Sakshi Malik: “ब्रिजभूषण सिंह यांनी त्यांच्या बेडवर मला…”, लैंगिक अत्याचार प्रकरणी साक्षी मलिकचा धक्कादायक दावा

आयडीएफचे प्रवक्ते रिअर ॲडमिरल डॅनियल हगरी यांनी सांगितलं की, ‘इस्रायली हवाई दलाने हेजबोलाच्या आर्थिक सामग्रीवर अचूक हल्ले केले. कडेकोट सुरक्षा असलेल्या गुप्त ठिकाणी आमचे लक्ष्य होते. येथे एक भूमिगत तिजोरी आहे. ज्यामध्ये लाखो डॉलर्स रोख रक्कम आणि सोने ठेवण्यात आले होते. हेजबोला हा पैसा हल्ला करण्यासाठी वापरत होता. तसेच बंकर मुद्दाम हॉस्पिटलच्या खाली करण्यात आले होते. त्यात अब्जावधी डॉलर्सची रोख रक्कम आणि सोने आहे. ते पैसे लेबनॉनच्या पुनर्वसनासाठीही वापरले गेले असते’, असं त्यांनी म्हटलं आहे.

रिअर ॲडमिरल डॅनियल हगरी यांनी असंही म्हटलं की, ‘मी लेबनीज सरकार, लेबनीज अधिकारी आणि आंतरराष्ट्रीय संघटनांना आवाहन करतो की, हेजबोला दहशतवादासाठी आणि इस्रायलवर हल्ला करण्यासाठी पैसे वापरू देऊ नका. बंकर इतर दोन इमारतींशी जोडलेला आहे. या बंकरमध्ये राहण्यासाठी खोल्या देखील आहेत. मात्र, आमचे युद्ध लेबनॉनच्या नागरिकांच्या विरुद्ध नाही. पण एका दहशतवादी संघटनेविरुद्ध आहे’, असंही त्यांनी म्हटलं.

कोण होता हसन नसरल्लाह?

हसन नसरल्लाहचा जन्म १९६० साली लेबनॉनमधील बेरूत येथे एका गरीब शिया कुटुंबात झाला होता. धर्मातील स्वारस्यामुळे त्याला इराकमधील नजफ येथील शिया सेमिनरीमध्ये शिकण्यास पाठविण्यात आले. तो सेमिनरीमधील सय्यद मुसा सदर यांसारख्या प्रमुख धर्मगुरूंमुळे प्रभावित झाला होता. १९७५ मध्ये सुरू झालेल्या लेबनीज गृहयुद्धाचा नसरल्लाह याच्या जीवनावर परिणाम झाला होता. तो पूर्वी शिया मिलिशियामध्ये सामील झाला आणि त्यानंतर इस्रायल व पाश्चात्त्य प्रभावाला विरोध करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या हिजबुल या संघटनेत सामील झाला. १९९२ मध्ये हिजबुलचा तत्कालीन नेता सय्यद अब्बास मुसावी याची इस्रायली सैन्याने हत्या केली. त्यानंतर नसरल्लाह याने या संघटनेचा पदभार हाती घेतला होता. त्याच्या मार्गदर्शनाखाली हिजबुलने आपली लष्करी क्षमता व राजकीय प्रभाव वाढवला आणि लेबनॉनमधील हा सर्वांत मोठा राजकीय पक्ष ठरला. २०१८ च्या संसदीय निवडणुकीत हिजबुलला ३,४०,००० हून अधिक मते मिळाली. लेबनॉनच्या स्वातंत्र्यानंतर कोणत्याही पक्षासाठी ही मते सर्वाधिक होती. नसरल्लाहच्या नेतृत्वाखाली हिजबुलची लष्करी ताकद बरीच वाढली. २०२१ च्या भाषणात नसरल्लाह याने दावा केला की, हिजबुलकडे एक लाख लढवय्ये आहेत ज्यामुळे ‘हिजबुल’ जागतिक स्तरावर सर्वांत शक्तिशाली सशस्त्र गटांपैकी एक ठरला. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच हसन नसरल्लाहला इस्रायलच्या सैन्याने ठार केले.