Israel Lebanon War : इस्रायल आणि लेबनॉन यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस वाढत जात आहे. हेझबोलाचा प्रमुख हसन नसरल्लाहला ठार केल्यानंतरही इस्रायलने लेबनॉनवर हल्ले सुरू ठेवले आहेत. इस्रायल डिफेंस फोर्सने दक्षिणी लेबनॉनच्या हेझबलाच्या ठिकाणांवर लिमिटेड ग्राऊंड ऑपरेशन सुरू केले आहे.

आयडीएफने पोस्ट केले की, “राजकीय नेतृत्त्वाच्या निर्णयानुसार काही तासांपूर्वी आयडीएफने दक्षिण लेबनॉनमधील हेझबोला दहशतवादी लक्ष्य आणि पायाभूत सुविधांच्या विरोधात मर्यादित, स्थानिकीकृत आणि लक्ष्यित जमिनीवर हल्ले करण्यास सुरुवात केली आहे. या हल्ल्यांमध्ये सीमेजवळील गावे लक्ष्ये करण्यात आली आहेत. यामुळे उत्तर इस्रायलमधील इस्रायली समुदायांना त्वरित धोका निर्माण करतात.”

Prime Minister Narendra Modi with Israeli counterpart Benjamin Netanyahu
Israel Attack : इस्रायल- लेबनॉनदरम्यान वाढत्या संघर्षावर मोदींचा थेट बिन्यामिन नेतान्याहू यांना फोन; म्हणाले, “जगात…”
Amitabh Bachchan And Rajesh Khanna
“आम्ही अमिताभ बच्चन यांना आणून राजेश खन्नाचे करिअर…
Kirit Somaiya
Kirit Somaiya : “मला न विचारताच घोषणा”, किरीट सोमय्यांनी भाजपाचा आदेश धुडकावला; म्हणाले, “पुन्हा अशी वागणूक…”
Who killed Akshay Shinde Encounter Badlapur Sexual Assault Case Update in Marathi
Akshay Shinde Encounter: अक्षय शिंदेवर गोळी झाडणारा पोलीस अधिकारी कोण? चकमकफेम प्रदीप शर्मांबरोबर केलं होतं काम
Israeli PM Netanyahu at UN Shows India map as Blessing
Israeli PM Netanyahu : इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहूंनी UN मध्ये भारताचा नकाशा दाखवला; मध्य-पूर्वेतील संघर्षावर मोठं वक्तव्य
Nitin Gadkari
Nitin Gadkari : १९०० कोटींमध्ये रस्ता बांधून ८००० कोटी टोल का वसूल केला? नितीन गडकरींना थेट प्रश्न, हिशेब सांगत म्हणाले…
Akshay Shinde Shot Dead Badlapur Sexual Assault Case Amit Thackeray Remark
Akshay Shinde Encounter : अक्षय शिंदेंच्या एन्काउंटरवरून अमित ठाकरेंच्या पोस्टने वेधलं लक्ष; फडणवीसांसह विरोधकांच्या भूमिकेवर प्रश्न
Sharad Pawar Reaction on Akshay Shinde Death
Sharad Pawar : “गृहविभागाने दाखवलेला हलगर्जीपणा…”, अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर शरद पवारांची प्रतिक्रिया

हेही वाचा >> अग्रलेख : अधर्मयुद्धाचा अंत?

“आयडीएफ जनरल स्टाफ आणि नॉर्दर्न कमांडने ठरवलेल्या पद्धतशीर योजनेनुसार कार्य करत आहे. यासाठी IDF सैनिकांनी अलीकडच्या काही महिन्यांत प्रशिक्षण आणि तयारी केली होती. इस्त्रायली हवाई दल आणि IDF तोफखाना या क्षेत्रातील लष्करी लक्ष्यांवर अचूक हल्ल्यांसह भूदलाला पाठिंबा देत आहेत. या ऑपरेशन्स मंजूर करण्यात आल्या आणि राजकीय समुहाच्या निर्णयानुसार पार पाडल्या गेल्या. ऑपरेशन “Northern Arrows” परिस्थितीजन्य मूल्यांकनानुसार आणि गाझा व इतर क्षेत्रांमध्ये लढण्यासाठी समांतर चालू राहील”, असंही आयडीएफने स्पष्ट केलं.

हेही वाचा >> Israel Attack : इस्रायल- लेबनॉनदरम्यान वाढत्या संघर्षावर मोदींचा थेट बिन्यामिन नेतान्याहू यांना फोन; म्हणाले, “जगात…”

इस्रायल नागरिकांचं संरक्षण करणार

“आयडीएफ युद्धाची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी प्रयत्न करत आहे. इस्रायलच्या नागरिकांचे रक्षण करण्यासाठी आणि उत्तर इस्रायलमधील नागरिकांना त्यांच्या घरी परतण्यासाठी आवश्यक ते सर्व करत आहे”, असंही आयडीएफने म्हटलं आहे.

पेजर हल्ले, दोन आठवडे हवाई हल्ले आणि गेल्या आठवड्यात हेझबोला प्रमुख हसन नसराल्लाह याच्या हत्येनंतर इस्रायलने जमिनीवरु आक्रमण केले आहे. लेबनीज सरकारच्या म्हणण्यानुसार, हवाई हल्ल्यांमुळे सुमारे एक हजार नागरिक मारले गेले आणि दहा लाख लोकांना त्यांची घरे सोडून पळून गेली. तसंच, अनेक हेजबोला कमांडर्स ठारे झाले आहेत. लेबनॉनच्या दक्षिणेकडील प्रदेश, पूर्व बेका व्हॅली आणि बेरूतवर इस्त्रायली हल्ल्यात गेल्या २४ तासांत किमान ९५ लोक मारले गेले आणि १७२ जखमी झाले, लेबनॉनच्या आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी पहाटे रॉयटर्सला ही माहिती दिली.