Israel Iran War Joe Biden Order to US Army : इस्रायल-हमास, इस्रायल-हेझबोला यांच्यातील युद्धानंतर आता इस्रायल-इराण युद्ध पेटलं आहे. इराणने मंगळवारी (१ ऑक्टोबर) रात्री इस्रायलची राजधानी तेल अविववर मोठा हल्ला केला. इराणने इस्रायलवर २०० बॅलिस्टिक क्षेपणास्रे डागल्यानंतर संपूर्ण इस्रायलमध्ये सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. इस्रायलही इराणला जशास तसं उत्तर देण्यास सज्ज झाला आहे. हमास, हेझबोला आणि आता इराणच्या हल्ल्यानंतर एकट्या पडलेल्या इस्रायलच्या मदतीसाठी अमेरिका पुढे सरसावली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी अमेरिकेच्या लष्कराला आदेश दिले आहेत की त्यांनी इराणची क्षेपणास्रं उद्ध्वस्त करावीत. बायडेन यांनी म्हटलं आहे की, माझ्या निर्देशांनुसार अमेरिकेचं लष्कर इस्रायलचं रक्षण करण्यास मैदानात उतरेल. आम्ही इस्रायली लष्कराची मदत करू.

बायडेन म्हणाले, “आम्ही सध्या माहिती गोळा करत आहोत. आतापर्यंत आमच्यापर्यंत आलेल्या माहितीनुसार इराणने इस्रायलवर केलेला हल्ला पूर्णपणे अयशस्वी व कुचकामी ठरल्याचं दिसून येत आहे. हा इस्रायलच्या लष्करी सामर्थ्याचा, क्षमतेचा व अमेरिकन सैन्याच्या ताकदीचा पुरावा आहे”.

israeli attacks targeting hamas and hezbollah fighters
अग्रलेख : अधर्मयुद्धाचा अंत?
2nd October Rashi Bhavishya & Panchang
२ ऑक्टोबर पंचांग: सर्वपित्री अमावस्या कोणासाठी ठरणार शुभ?…
Israel confirms idf eliminated hezbollah chief hassan nasrallah
Israel Hezbollah War : इस्रायलचा हेजबोलावर घाव! हवाई हल्ल्यात दहशतवादी हसन नसराल्लाहचा खात्मा; IDF ची माहिती
Israel-Lebanon conflict,
लेबनॉनशी युद्धविरामाची अमेरिकेची सूचना इस्रायलनं फेटाळली; सर्वशक्तिनिशी हेजबोलाशी लढण्याचे लष्कराला आदेश!
vladimir putin offers immediate ceasefire if ukraine abandons nato plans
Putin issues nuclear warning: पुतिन यांची अणुयुद्धाची धमकी, युक्रेनच्या हल्ल्यानंतर संतापले; इस्रायलही लेबनानवर धडक देणार
Hezbollah commander killed marathi news,
इस्रायलच्या हल्ल्यात हेजबोलाचा प्रमुख कमांडर ठार
Israel-Hezbollah War live updates
Hezbollah-Israel conflict: हेझबोलाने इस्रायलवर १४० क्षेपणास्त्र डागले, इस्रायलचाही प्रतिहल्ला; पेजर स्फोट झाल्यानंतर युद्धाला तोंड फुटले?
Hezbollah leader Sayyed Hassan Nasrallah
Lebanon : “ही युद्धाची घोषणा समजा”, लेबनॉनमधील पेजर्सच्या स्फोटानंतर हेझबोलाच्या प्रमुख नेत्याचं विधान

हे ही वाचा >> “इराणनं आमच्यावर हल्ला करून मोठी चूक केली, आता त्यांना…”, इस्रायलनं दिला थेट इशारा

काय म्हणाले जो बायडेन?

इराणच्या इस्रायलवरील हल्ल्यावर प्रतिक्रिया देताना बायडेन म्हणाले, “अमेरिका मध्य-पूर्वेतील राष्ट्रांमध्ये घडणाऱ्या घडामोडींवर बारीक लक्ष ठेवून आहे. आम्ही इस्रायलच्या रक्षणासाठी वचनबद्ध आहोत. इस्रायली लष्कर व अमेरिकन सैन्यामधील योग्य ताळमेळ व नियोजनामुळेच इराणचा हा हल्ला हाणून पाडण्यात आम्ही यशस्वी ठरलो. अमेरिका या युद्धात इस्रायलबरोबर आहे. मी आज माझा बराचसा वेळ यावर चर्चा करण्यात, महत्त्वाचे निर्णय घेण्यात घालवला. तसेच मी थेट इस्रायली सरकारशी सल्लामसलत केली आहे. आपलं (अमेरिका) राष्ट्रीय सुरक्षा दल मी आदेश दिल्याप्रमाणे काम करत आहे, इस्रायलची मदत करत आहे.

हे ही वाचा >> Fraud Supreme Court : बनावट सर्वोच्च न्यायालय, बोगस सरन्यायाधीश अन् खोटा निकाल… सायबर ठगांचा व्यावसायिकाला सात कोटींचा गंडा

बिन्यामिन नेतान्याहूंचा इराणला इशारा

दरम्यान, इराणच्या इस्रायलवरील हल्ल्यानंतर इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांनी यांनी इशारा देत म्हटलं आहे की जो कुणी आमच्यावर हल्ला करेल, त्याला आम्ही हल्ल्याने उत्तर देऊ. तसेच इराणच्या हल्ल्याला आम्ही परतवून लावलं आहे. या अपयशी हल्ल्याला लवकरच प्रत्युत्तर दिलं जाईल. हमास आणि हेझबोलाची जी अवस्था केली आहे, तीच इराणची केली जाईल.