Israel Attack on Iran: शनिवारी रात्री इस्रायलने इराणवर थेट हवाई हल्ला केला. १ ऑक्टोबर रोजी इराणने इस्रायलवर १८० क्षेपणास्त्र डागले होते. या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून २६ दिवसांनंतर इस्रायलकडून सदर हल्ला केला गेल्याचे इस्रायल डिफेन्स फोर्सने एक्सवर पोस्ट करून सांगितले आहे. शनिवारी पहाटे इस्रायलने इराणमधील लष्करी तळांना लक्ष्य केले. यानंतर आता दोन्ही देशांमध्ये युद्ध भडकण्याची शक्यता वर्तविली जात आहे. इस्रायलने दिलेल्या माहितीनुसार, इराणमधील १० लष्करी तळांना लक्ष्य केले गेले आहे. हा हल्ला फक्त लष्करी तळापुरताच मर्यादित होता. इतर ठिकाणी हल्ले झाले नाहीत, असा दावा इस्रायलने केला आहे. इराणचे या हल्ल्यात किती नुकसान झाले, याबाबतची माहिती मात्र अद्याप मिळू शकलेली नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

इराणच्या लष्कराने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले की, इराण आणि स्थानिक दहशतवादी संघटना ७ ऑक्टोबर २०२३ पासून इस्रायलवर चहुबाजूंनी हल्ला होत आहे. इराणच्या भूमीवरून तर इस्रायलवर थेट हल्ले झाले आहेत. जगातील इतर सार्वभौम देशांप्रमाणेच इस्रायललाही त्यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे प्रत्युत्तर देण्याचा अधिकार आहे. दरम्यान हे हल्ले कुठून, कसे करण्यात आले, याची मात्र कोणतीही माहिती दिली गेली नाही.

इराणमधील माध्यमांनी दिलेल्या बातम्यांनुसार राजधानी तेहरानच्या आसपासही दोन हल्ले झाल्याची माहिती मिळत आहे. इस्रायलच्या आक्रमकतेला आम्हीही उत्तर देऊ, असे इराणकडून सुचित करण्यात आले आहे.