इस्रायलने रविवारी सीरियावर क्षेपणास्त्राचा मारा केला. या हल्ल्यामुळे इस्रायल आणि सीरियामध्ये १९७३ पासून लागू असलेल्या शस्त्रविरामाचे इस्रायलने पहिल्यांदा उल्लंघन केले आहे. इस्रायलच्या या आक्रमक धोरणामुळे पश्चिम आशियातील शांततेला पुन्हा एकदा धोका निर्माण झाला आहे. सीरियाने गोलान हाईट्सवर उखळी ताफांचा मारा केल्यामुळे इस्रायलकडून क्षेपणास्त्र डागण्याची कृती करण्यात आली, अशी माहिती इस्राइल डिफेन्स फोर्स (आयडीएफ)ने दिली. मागील आठवडाभरात सीरियाकडून चारदा उखखी तोफांचा मारा करण्यात आला असल्याचे आयडीएफच्या प्रवक्त्याने सांगितले.
सीरियाचे अध्यक्ष बाशर असद आणि बंडखोर यांच्यामध्ये गेल्या काही महिन्यांपासून सशस्त्र संघर्ष सुरू आहे. या संघर्षांतूनच मोर्टरच्या माऱ्याची कृती करण्यात आली असावी, असा अंदाज या प्रवक्त्याने व्यक्त केला.   

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा