Israel Need India’s cooperation to Start Metro Project in Tel Aviv : इस्रायलचे भारतातील नवनियुक्त राजदूत रुवेन अझर यांनी उभय देशांचे संबंध, इस्रायल – हमास युद्ध, या युद्धातील भारताची भूमिका, पायाभूत सुविधांच्या क्षेत्रातील भारताची प्रगती, दोन्ही देशांमधील वेगवेगळ्या क्षेत्रांमधील भागीदारी अशा अनेक विषयांवर भाष्य केलं. बांधकाम, निर्मिती व पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात भारताने केलेली प्रगती व देशभर चाललेल्या विकासकामांचा उल्लेख करत रुवेन अझर म्हणाले, आम्हालाही तेल अविवमध्ये १०० किलोमीटर लांबीची मेट्रो सेवा सुरू करायची आहे. त्यासाठी आम्ही जगभरातील कंपन्यांना, प्रामुख्याने भारतातील कंपन्यांना आकर्षित करण्याचा प्रयत्न आहोत.

दी इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत रुवेन अझर म्हणाले, “तेल अविवमध्ये मेट्रोच्या निर्मितीसाठी आम्ही आंतरराष्ट्रीय कंपन्यांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहोत. ज्या कंपन्या कमी खर्चात उत्तम दर्जाची मेट्रो सेवा निर्माण करू शकतात अशा कंपन्यांकडे आमचं लक्ष आहे. भारताकडे ही क्षमता आहे. भारत अनेक वर्षांपासून वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आमचा भागीदार राहिला आहे. भारतात रस्ते, विमानतळं, बंदरांशिवाय हजारो किलोमीटर लांबीच्या मेट्रो प्रकल्पांवर काम केलं जात आहे. त्यामुळे आमचं भारतातील कंपन्यांकडे लक्ष आहे”.

Narendra Modi Subhash Desai
Narendra Modi : “मला ८४ हजारांची पेन्शन मिळते, मोदींना किती रुपये मिळतील माहितीय का?”, सुभाष देसाईंनी सगळी आकडेवारी मांडली
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…
Port Blair Centre renames amit shah
Port Blair : मोदी सरकारचा मोठा निर्णय; अंदमान-निकोबारच्या राजधानीचं नाव बदललं, पोर्ट ब्लेअर ‘या’ नावाने ओळखलं जाणार
Kirit Somaiya
Kirit Somaiya : “मला न विचारताच घोषणा”, किरीट सोमय्यांनी भाजपाचा आदेश धुडकावला; म्हणाले, “पुन्हा अशी वागणूक…”
LokPoll Survey Results in Maharashtra
LokPoll Survey: महाराष्ट्रात लोकसभेची पुनरावृत्ती होणार; मविआला १४१ ते १५४ जागा, तर महायुतीला…
oil and gas reserves found in the sea of ​​Pakistan how equation can change for Pakistan
पाकिस्तानच्या समुद्रात आढळला प्रचंड खनिज तेलसाठा? उत्खननाची क्षमता किती? उद्ध्वस्त अर्थव्यवस्थेची भाग्यरेखा बदलेल?
Who is Jaydeep Apte in Marathi
Jaydeep Apte : जयदीप आपटेला पोलिसांनी हाक मारली, रडत गयावया करु लागला आणि म्हणाला; “मला…”
What Taslima Nasrin Said?
Taslima Nasreen : “दहशतवाद एक दिवसात तयार होत नाही, आधी धर्मांधता जन्म घेते आणि…” तस्लिमा नसरीन यांचं वक्तव्य

हे ही वाचा >> “आम्ही भारतात जिवंत परत येऊ असं वाटलं नव्हतं”; रशिया-युक्रेन युद्धात लढलेल्या कर्नाटकच्या तिघांनी सांगितली आपबीती!

इस्रायलला भारताकडून मदतीची अपेक्षा

गेल्या अनेक दशकांच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलंय की इस्रायल त्यांच्या देशातील निर्मिती क्षेत्रातील कामासाठी भारताकडे मदत मागतोय. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात हमासने इस्रायलवर हल्ला केल्यानंतर इस्रायलने पॅलेस्टिनी कामगार व मजुरांवर निर्बंध घातले आहेत. त्या पार्श्वभूमीवर तिथले अनेक प्रकल्प मजुरांअभावी खोळंबले आहेत. अशात त्यांना या आघाडीवरही भारताकडून मदतीची अपेक्षा आहे.

यावेळी रुवेन अझर यांनी इस्रायल-भारत संबंध, संरक्षण व सुरक्षा, कृषी व पाणी, इनोव्हेशन व स्टार्ट-अप्स, बांधकाम क्षेत्रासह वेगवेगळ्या क्षेत्रातील उभय देशांमधील भागीदाऱ्यांवर प्रकाश टाकला. तसेच ते म्हणाले, सेमीकंडक्टर्स व सायबर सुरक्षेच्या क्षेत्रात परस्पर सहकार्याची आपल्याला निश्चित आवश्यकता आहे.

हे ही वाचा >> Faridabad : Video : पाण्याचा अंदाज न आल्याने गाडी पाण्यात घातली अन् घडली दुर्दैवी घटना; बँकेच्या मनेजरसह एकाचा बुडून मृत्यू

गाझामधील युद्धावरही केलं भाष्य

इस्रायल हमास युद्धावर बोलताना रुवेन अझर म्हणाले, भारताने या युद्धाबाबत काय निर्णय घ्यायचा तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. कुठपर्यंत या युद्धात सहभागी व्हायचं ते त्यांचं नेतृत्व ठरवेल. पश्चिम आशियात त्यांच्या भूमिकेला महत्त्व मिळू लागलं आहे. भारत त्यांच्या भूमिकेद्वरे आमच्या भागात (पश्चिम आशिया) स्थिरता आणि समृद्धी आणू शकतो”.