Israel – Palestine News in Marathi : इस्रायल आणि हमासदरम्यान सुरू झालेले युद्ध सातव्या दिवशीही सुरू आहे. हे युद्ध लवकर संपुष्टात येईल असे कोणतेही चिन्ह दिसत नाही. त्यामुळे गाझा पट्टीत हमासविरोधात जमिनीवरील मोहीम सुरू करण्यासाठी सैन्य सज्ज होत असल्याचे इस्रायलच्या लष्करातर्फे सांगण्यात आले. दरम्यान, २४ तासांच्या आत उत्तर गाझा रिकामे करण्याचे आदेश इस्रायलने दिले आहेत. यामुळे जवळपास ११ लाख नागरिकांना गाझातून स्थलांतरीत व्हावं लागणार आहे. इस्रायलच्या एकूण लोकसंख्येच्या ५० टक्के ही लोकसंख्या आहे.

पॅलेस्टाईनची दहशतवादी संघटना हमासने गाझा पट्टीवरून इस्रायलवर हल्ला चढवला आहे. त्यामुळे इस्रायलनेही गाझा पट्टीवरील नागरिकांची नाकाबंदी केली आहे. पाणी, अन्न, इंधन पुरवठा बंद करण्यात आला आहे. तर, हमास ओलिसांची सुटका करत नाही तोपर्यंत गाझा पट्टीमध्ये कोणतीही मानवतावादी मदत पोहोचू दिली जाणार नाही असा इशारा इस्रायलचे ऊर्जामंत्री इस्रायल काट्झ यांनी दिला. दुसरीकडे इस्रायलने गाझातील नागरिकांना स्थलांतर करण्याचे निर्देश दिले आहेत. परंतु, यामुळे विनाशकारी मानवतावादी परिणामांशिवाय हे आदेश अशक्य असल्याची प्रतिक्रिया संयुक्त राष्ट्राचे प्रवक्ते स्टीफन दुजारिक दिली आहे. म्हणजेच, यामुळे विनाशकारी मानवतावादी परिणाम होतील, असा इशारा देण्यात आला आहे.

uddhav thackeray criticized amit shah
“गद्दारांनी गुवाहाटीचा डोंगर बघितला, आता त्यांना टकमक टोक दाखवायचंय”, उद्धव ठाकरेंची शहाजीबापू पाटलांवर घणाघाती टीका!
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
Sanjay Raut and Mallikarjun Kharge
खरगेंच्या मुखी समर्थ रामदासांचा श्लोक, पण संजय राऊत निरुत्तर; जाहीरनामा प्रसिद्ध करताना नेमकं काय घडलं?
maharashtra assembly election 2024 issue of bullying is effective in campaigning in three constituencies of Marathwada
मराठावाड्यातील तीन मतदारसंघांत गुंडगिरीचा मुद्दा प्रचारात प्रभावी
Amit Shah on Uddhav Thackeray
Amit Shah : “उद्धव ठाकरे तुमच्यात दम असेल तर…”, अमित शाहांचं भर सभेत खुलं आव्हान, म्हणाले…
Navri Mile Hitlarla
एजेवर येणार मोठे संकट, श्वेताच्या ‘त्या’ कृतीमुळे होणार अटक; ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिका नव्या वळणावर
BJP Manifesto For Election
BJP Manifesto : भाजपाच्या जाहीरनाम्यात लाडक्या बहिणींना २१०० रुपये देण्याचं आश्वासन , शेतकऱ्यांना कर्जमाफीसह ‘या’ घोषणा
Devendra fadnavis mim
‘एमआयएम’वर उद्धव ठाकरेंपेक्षा देवेंद्र फडणवीस यांची अधिक प्रखर टीका

हेही वाचा >> “दहशतवादाच्या व्याख्येवर जगाचं एकमत न होणं…”, इस्रायल-हमास युद्धाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींचं मोठं वक्तव्य

इस्रायलच्या संरक्षण खात्याकडून नेमकं काय सांगण्यात आलं?

“IDF (Isrel Defense Foreces) ने गाझा शहरातील सर्व नागरिकांना त्यांच्या स्वतःच्या सुरक्षिततेसाठी आणि संरक्षणासाठी गाझाच्या दक्षिणेकडे स्थलांतर करण्याचे आवाहन केले आहे. हमास या दहशतवादी संघटनेने इस्रायलविरुद्ध युद्ध पुकारले आहे आणि गाझा शहर हे असे क्षेत्र आहे जिथे सर्वाधिक लष्करी कारवाया होत आहेत. त्यामुळे तुमचं स्थलांतर तुमच्या स्वतःच्या सुरक्षिततेसाठी आहे. येथील परिस्थिती पूर्ववत झाल्यानंतर तुम्हाला परत येण्याकरता घोषणा केली जाईल, त्यावेळी तुम्ही येथे परत येऊ शकाल. इस्रायलसह सुरक्षा कुंपणाच्या क्षेत्राजवळ जाऊ नका. हमासचे दहशतवादी गाझा शहरात घरांच्या खाली असलेल्या बोगद्यांमध्ये आणि निष्पाप गाझान नागरिक असलेल्या इमारतींमध्ये लपले आहेत. गाझा शहरातील नागरिकांनो, तुमच्या स्वतःच्या सुरक्षिततेसाठी आणि तुमच्या कुटुंबियांच्या सुरक्षिततेसाठी दक्षिणेतून बाहेर पडा आणि तुमचा मानवी ढाल म्हणून वापर करणाऱ्या हमासच्या दहशतवाद्यांपासून स्वतःला दूर ठेवा. पुढील काही दिवस, IDF गाझा शहरात लक्षणीयरीत्या कार्यरत राहणार आहे. त्यामुळे नागरिकांना इजा होऊ नये यासाठी व्यापक प्रयत्न करण्यात येत आहे”, असं IDF च्या X च्या खात्यावर सांगण्यात आलं आहे.

हमासकडून इस्रायलच्या आदेशाची खिल्ली

गाझातील नागरिकांसाठी इस्रायलने स्थलांतर होण्याचे आदेश दिल्याने हमासने खिल्ली उडवली आहे. हा बनावट प्रचार असल्याचा आरोप हमासने केला आहे. तसंच, नागरिकांनी या प्रचाराला बळी न पडण्याचे आवाहन हमासने केले आहे.

सहाव्या दिवशी युद्धबळींची संख्या किमान २,५०० इतकी झाली आहे. इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेप्रमाणेच हमासला चिरडून नष्ट करण्याचा इशारा नेतान्याहू यांनी दिला आहे. दरम्यान, अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटनी ब्लिंकन यांनी गुरुवारी इस्रायलमध्ये जाऊन पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांनी संयुक्तपणे पत्रकार परिषद घेतली. ब्लिंकन यांच्या भेटीची नेत्यानाहू यांनी प्रशंसा केली.