इस्रायल आणि हमासच्या युद्धाला १८ दिवसांचा कालावधी पूर्ण झाला आहे. पण, इस्रायल आणि हमासकडून एकमेकांवर हल्ले चालूच आहेत. या युद्धावर चीननं टीका केली होती. पण, आता चीननं आपल्या भूमिकेत बदल केला आहे. इस्रायलला स्वत:चे संरक्षण अधिकार आहे, असं चीननं म्हटलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी इस्रायलचे परराष्ट्र मंत्री एली कोहेन यांच्याशी सोमवारी ( २३ ऑक्टोबर ) फोनवरून चर्चा केली. “आंतरराष्ट्रीय मानवी हितांच्या कायद्याचं पालन करताना प्रत्येक देशाला स्वत:चं संरक्षण करण्याचा अधिकार आहे,” असं मत वांग यी यांनी यावेळी व्यक्त केलं.

हेही वाचा : हमासच्या दहशतवाद्यांनी मृतदेहाखाली अन् शाळेच्या बॅगमध्ये लपवली स्फोटके; VIDEO व्हायरल

गेल्या आठवड्यात चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी युद्ध थांबवण्याचं आवाहन केलं होतं. इजिप्त आणि अरब देशांशी संपर्क साधून मध्यस्थी करत पॅलेस्टाईनच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यावर जिनपिंग यांचा भर होता. त्यातच इस्रायलला स्वत:चं संरक्षण करण्याचा अधिकार असल्याचं चीननं मान्य केलं आहे. पण, हमासचा साधा निषेधही चीननं व्यक्त केला नाही.

वांग यांनी सोमवारी सांगितलं, “इस्रायल आणि पॅलेस्टाईनमधील युद्धामुळं चीन खूप चिंतेत आहे. या युद्धामुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांचे बळी गेल्यानं दु:ख झालं आहे.”

हेही वाचा : रस्ते अडवले, कारमधील नागरिकांवर अंदाधुंद गोळीबार; हमासनं केलेल्या हल्ल्याचा थरकाप उडवणारा VIDEO समोर

अमेरिकेची टीका

बीजिंग दौऱ्यात अमेरिकन काँग्रेसच्या नेत्यांनी इस्रायल-हमास युद्धाच्या मुद्द्यावर शी जिनपिंग यांच्याशी चर्चा केली होती. सिनेटचे नेते चक शूमर यांनी चीनला इस्रायला पाठीशी उभे राहून हल्ल्याचा निषेध व्यक्त करण्यास सांगितलं होतं. तसेच, या कठीण काळात वांग यांनी इस्रायलबद्दल कुठलीही सहानुभूती किंवा पाठिंबा दिला नाही, अशी टीका चक शूमर यांनी केली होती. ‘एनडीटीव्ही’नं हे वृत्त दिलं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Israel palestine hamas war china affirms israel right to self defense shifting stance ssa
Show comments