इस्रायल आणि पॅलेस्टाईनमधील दहशतवादी संघटना हमासमध्ये गेल्या दहा दिवसांपासून युद्ध सुरू आहे. या युद्धात आतापर्यंत तीन हजारांहून अधिक लोकांचा बळी गेला आहे. गेल्या शनिवारी (७ ऑक्टोबर) हमासच्या दहशतवाद्यांनी इस्रायलवर शेपणास्रं डागली. त्यामुळे इस्रायलच्या सीमा भागात अनागोंदी माजली. या अनागोंदीचा फायदा घेत हमासचे दहशतवादी इस्रायलमध्ये घुसले आणि त्यांनी इस्रायली नागरिकांची कत्तल केली. तसेच इस्रायली स्त्रियांचं अपहरण केलं. त्यामुळे इस्रायलनेही गाझा पट्टीत आणि पॅलेस्टाईनवर क्षेपणास्रं डागली. तेव्हापासून हे युद्ध सुरू आहे.

हमासच्या दहशतवाद्यांनी इस्रायलवर क्षेपणास्र हल्ला केला. पाठोपाठ जमीन, समुद्र आणि हवाई हल्ला केला. तसेच हमासच्या दहशतवाद्यांनी इस्रायलमध्ये घुसून इस्रायली नागरिकांवर हल्ला केला. दरम्यान, इस्रायली डिफेन्स फोर्सेसने एक व्हिडीओ जारी केला आहे. आयडीएफने म्हटलं आहे की हा व्हिडीओ हमासच्या एका दहशतवाद्याच्या बॉडी कॅमेराद्वारे चित्रित करण्यात आला आहे. हमासने इस्रायली चेक पोस्टवर केलेल्या हल्ल्यापासून ते तो दहशतवादी ठार होईपर्यंतचं चित्रण आयडीएफने समाजमाध्यमांवर शेअर केलं आहे. या व्हिडीओत हमासचे दहशतवादी त्यांच्या असॉल्ट रायफलद्वारे हल्ला करताना दिसत आहेत.

Irfan Pathan Showed how Cameraman zoom on fans during live cricket match watch video
Irfan Pathan : लाइव्ह मॅचमध्ये चाहत्यांवर कसा झूम होतो कॅमेरा? इरफान पठाणने शेअर केला खास VIDEO
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
youth assaults on duty traffic police at pune
Video: एवढा माज कुठून येतो? पुण्यात वाहतूक पोलिसाला भररस्त्यात मारहाण, व्हिडीओ व्हायरल
Naxals Blow Up Security Vehicle In Chhattisgarh's Bijapur, 9 Feared Dead
छत्तीसगडमध्ये पोलिसांच्या वाहनावर नक्षलवाद्यांकडून स्फोटक हल्ला; नऊ पोलीस जागीच ठार!
isis history
न्यू ऑर्लीन्समधील हल्लेखोर इस्लामिक स्टेटचा; ‘ISIS’मध्ये कशी केली जाते तरुणांची भरती? या संघटनेचा इतिहास काय?
new orleans attack isis again Active
विश्लेषण : ‘आयसिस’ पुन्हा सक्रिय झाली आहे का? अमेरिकेतील न्यू ऑर्लिन्स हल्ला कशाचे निदर्शक? धोका किती गंभीर?
Jitendra Awhad, Filming by police , Jitendra Awhad house, police at Jitendra Awhad house, Jitendra Awhad latest news,
VIDEO : जितेंद्र आव्हाडांच्या घरात पोलिसांकडून चित्रीकरण, आव्हाडांनी विचारला वरिष्ठ अधिकाऱ्यांना जाब
loksatta editorial on Islamic terrorism
अग्रलेख : खरोखरच खतरे में…

आयडीएफने हमासच्या दहशतवाद्यांनी इस्रायली संरक्षण दलाच्या चौकीवर हल्ला केल्यानंतरचा तीन मिनिटाचा व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये दिसतंय की, काही दहशतवादी बाइक आणि पिक-अप ट्रक्सवर बसून क्षेपणास्रं डागत आहेत. प्रोपेल्ड ग्रेनेड हल्ला करत आहेत. त्याचबरोबर रायफलने गोळीबार करताना दिसत आहेत.

हमासचे दहशतवादी आरपीजी आणि असॉल्ट रायफलने इस्रायली सैनिकांवर गोळीबार करत असल्याचं व्हिडीओत दिसतंय. इस्रायलमध्ये घुसल्यानंतर या दहशतवाद्यांनी रहिवासी परिसरात प्रवेश केला आणि तिथल्या घरांवर गोळीबार सुरू केला. तसेच रुग्णवाहिकेच्या चाकावर गोळी झाडली. पुढे ते एका घरात घुसले आणि तिथल्या इस्रायली नागरिकाची हत्या केली. त्यानंतर बंदुकीत नवीन मॅगजिन भरून दुसऱ्या घरात घुसले. या घरात जेवणाच्या टेबलवर एक फोन होता, घरातली वीजेची उपकरणं सुरू होती. सशस्त्र दहशतवाद्यांनी घराची तपासणी केली. परंतु, घरात कोणीच दिसलं नाही.

हे दहशतवादी काही अंतर चालले, तेवढ्यात इस्रायली संरक्षण दलाने त्यांच्यावर हल्ला केला. लपून बसलेल्या सैनिकांच्या गोळ्यांनी काही दहशतवादी ठार झाले. ज्या दहशतवाद्याच्या कपड्यांवर बॉडी कॅमेरा लावला होता, तो दहशतवादीदेखील यात ठार झाला.

Story img Loader