लेबनॉनवरील हवाई हल्ले थांबवून २१ दिवसांच्या युद्धविरामाची घोषणा करावी, असा प्रस्ताव अमेरिका आणि फ्रान्स यांनी इस्रायल सरकारला दिला होता. मात्र, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी हा प्रस्ताव फेटाळून लावला आहे. यासंदर्भात इस्रायलच्या परराष्ट्र मंत्रायलायकडून माहिती देण्यात आली आहे. याउलट हेजबोलाशी सर्वशक्तिनिशी लढण्याचे आदेश लष्कराला दिले असल्याचं इस्रायल सरकारकडून सांगण्यात आलं आहे. त्यामुळे दोन्ही देशांदरम्यान होणारे हल्ले इतक्यात थांबतील, याची शक्यता कमी आहे.

‘द इंडियन एक्सप्रेस’ने दिलेल्या वृत्तानुसार, इस्रायलचे परराष्ट्र मंत्री कॅटझ यांनी एक्स या समाज माध्यमावर पोस्ट करत यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. अमेरिका आणि फ्रान्सने युद्धाविराम करण्यासंदर्भात दिलेला प्रस्ताव इस्रायलने फेटाळला आहे. जोपर्यंत हेजबोलाला संपवण्याचं आमचं लक्ष्य पूर्ण होणार नाही, तोपर्यंत उत्तर लेबनॉनवरील आमचे हल्ले सुरु राहतील. हेजबोलाशी आम्ही सर्वशक्तिनिशी लढत राहू, असे ते म्हणाले.

Bomb attack on Benjamin Netanyahu's house, Israeli Prime Minister's residence targeted.
Benjamin Netanyahu: इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांच्या घरावर बॉम्बहल्ला; संरक्षण मंत्री म्हणाले, “शत्रूंनी….”
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
gadchiroli bhamragarh Naxalite bomb blast
अमित शहांच्या गडचिरोली दौऱ्याआधी भामरागडमध्ये बॉम्बस्फोट, सुदैवाने…
Ashish Shelar on Vote Jihad
Vote Jihad: “एक ऐसा व्होट जिहाद…”, सज्जाद नोमानी यांच्या विधानाचा व्हिडीओ शेअर करत आशिष शेलारांची मविआवर टीका
Amit Shah left public meeting after five minutes due to fear of helicopter couldnt fly after 6 pm
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणतात,’ मोदींनी नक्षलवाद व आतंकवाद संपविला’
Priya Sarvankar on Amit Thackeray
‘त्या’ युवराजाला जनता कंटाळली, आता हा ‘राज’पुत्र काय करणार?, सदा सरवणकरांच्या मुलीची दोन्ही ठाकरेंवर जोरदार टीका
Afghan national behind Iran's plot to assassinate Donald Trump
ट्रम्प यांच्या हत्येचा कट इराणनेच रचला होता? या संदर्भात अटक झालेला फरहाद शकेरी कोण आहे?
drones paragliding banned in pune on occasion of pm narendra modi visit
पंतप्रधानांच्या दौऱ्यानिमित्त ड्रोन, पॅराग्लायडर उड्डाणास बंदी; आदेशाचा भंग केल्यास कारवाईचा इशारा

हेही वाचा – Putin issues nuclear warning: पुतिन यांची अणुयुद्धाची धमकी, युक्रेनच्या हल्ल्यानंतर संतापले; इस्रायलही लेबनानवर धडक देणार

अमेरिका आणि फ्रान्सने दिला होता युद्धविरामाचा प्रस्ताव

अमेरिका आणि फ्रान्सने लेबनॉनवरील हल्ले थांबवण्याचा प्रस्ताव इस्रायल सरकारला दिला होता. युद्धविराम घोषित करून चर्चेतून मार्ग काढावा, अशी विनंती दोन्ही देशाकडून करण्यात आली होती. या प्रस्तावाला ऑस्ट्रेलिया, कॅनडा, सौदी अरेबिया तसेच काही युरोपीय देशांनी समर्थन दिलं होतं. मात्र, आता इस्रायलने हा प्रस्ताव नाकारला.

हेही वाचा – Israeli vs Lebanon : इस्रायलचा लेबनॉनवर एअर स्ट्राईक, ४९२ जण ठार, १६४५ जखमी; हेझबोलाला नेस्तनाबूत करण्यासाठी नेतन्याहूंची योजना तयार, आता थेट…

इस्रायलच्या हल्ल्यात ६०० पेक्षा जास्त हेजबोलाच्या सैनिकांचा मृत्यू

दरम्यान, इस्रायल आणि लेबनॉन २००६ पासून एकमेकांवर हल्ले करत आहेत. गेल्या आठवड्यात लेबनॉनमध्ये झालेल्या पेजरच्या स्फोटानंतर हा हल्ल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. पेजरच्या स्फोटानंतर लेबनॉननेही इस्रायलवर क्षेपणास्र डागली होती. त्यानंतर प्रत्युत्तर म्हणून इस्रायलनेही लेबनॉनवर हल्ला केला. या हल्ल्यांमध्ये आतापर्यंत ६०० पेक्षा जास्त हेजबोलाच्या सैनिकांचा मृत्यू झाला आहे.

हेही वाचा – Who is Rinson Jose: लेबनान पेजर स्फोटाचं केरळ कनेक्शन! भारतीय वंशाचा ‘हा’ नागरिक चर्चेत येण्याचं कारण काय?

इस्रायलचं सैन्य सीमेवरून लेबनॉनमध्ये शिरणार?

इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतन्याहू यांनी लेबनॉनला लागून असलेल्या इस्रायलच्या सीमवर्ती भागातील लोकांना घरं रिकामी करण्यास सांगितलं आहे. त्यामुळे इस्रायली लष्कर जमिनी कारवाई करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा चालू आहे.