Israel Removes Wrong Indian Map of Jammu Kashmir : इस्रायलने त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावरील भारताचा एक नकाशा हटवला आहे. या नकाशात जम्मू काश्मीर राज्याचा बराचसा भाग पाकिस्तामध्ये असल्याचं दर्शवण्यात आलं होतं. हा नकाशा पाहून भारतीय नागरिकांनी समाजमाध्यमांवर नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर इस्रायलचे भारतातील राजदूत रुवेन अजार यांनी यावर प्रतिक्रिया देखील दिली होती. रुवेन म्हणाले होते की, “संकेस्थळाच्या संपादकाच्या चुकीमुळे तो नकाशा संकेतस्थळावर दिसत होता. आम्ही तो नकाशा संकेतस्थळावरून लगेच हटवला आहे”. एका भारतीय युजरने एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर या नकाशाचा फोटो (वेबसाइट पेजचा स्क्रीनशॉट) शेअर केला होता. त्यानंतर इतर नागरिकांनी देखील हा मुद्दा उचलून धरल्यानंतर ही गोष्ट इस्रायलच्या भारतातील राजदूतांपर्यंत आणि त्या संकेतस्थळाच्या संपादकापर्यंत पोहोचली. त्यानंतर त्यांनी तो वादग्रस्त नकाशा संकेतस्थळावरून हटवला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एका भारतीय युजरने इस्रायलच्या संकेतस्थळावरील भारताचा चुकीचा नकाशा एक्सवर शेअर करत म्हटलं होतं की “इस्रायलच्या हमास, हेझबोला, इराणबरोबरच्या संघर्षादरम्यान भारत इस्रायलबरोबर उभा आहे. परंतु, इस्रायल भारताबरोबर आहे का? इस्रायलच्या अधिकृत संकेतस्थळावरील भारताचा हा नकाशा पाहा. यामध्ये जम्म-काश्मीर राज्याकडे पाहा”. यावर प्रतिक्रिया देताना रुवेन अजार म्हणाले, “ही त्या संकेतस्थळाच्या संपादकांची चूक होती. आम्ही तो नकाशा संकेतस्थळावरून हटवला आहे. ही गोष्ट आमच्या निदर्शनास आणून दिल्याबद्दल धन्यवाद”.

हे ही वाचा >> Ayatollah Khamenei : “..तर इस्रायल फार काळ टिकणार नाही”, इराणच्या अयातुल्लाह खोमेनींचं पाच वर्षांत पहिल्यांदाच सार्वजनिक भाषण; लष्कराला म्हणाले…

नेमकं प्रकरण काय?

संपूर्ण जम्मू-काश्मीर भारताचा अविभाज्य भाग असल्याचं भारत नेहमीच ठणकावून सांगत आला आहे. मात्र इस्रायलमधील एका संकेतस्थळाने काश्मीरला पाकिस्तानचा भाग असल्याचं दाखवलं होतं. इस्रायलच्या सीमांवर सध्या युद्ध चालू आहे. इस्रायल एकाच वेळी हमास (पॅलेस्टाइनमधील दहशतवादी संघटना), हेझबोला (लेबनॉनमधील दहशतवादी संघटना) आणि इराणशी दोन हात करत आहे. या संघर्षाच्या काळात भारताने सातत्याने इस्रायली जनतेची बाजू घेतली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर भारत इस्रायलच्या खांद्याला खांदा लावून उभा आहे. अशातच काश्मीरप्रश्नी इस्रायलनेही भारताच्या बाजूने उभं राहावं ही येथील जनतेची अपेक्षा असणं स्वाभाविक आहे. त्यामुळेच हा वादग्रस्त नकाशा पाहून भारतीय नागरिकांनी समाजमाध्यमांवर नाराजी व्यक्त केली आहे. त्यानंतर इस्रायलने हा नकाशा त्यांच्या संकेतस्थळावरून हटवला आहे.

हे ही वाचा >> Kim Jong-un : इस्रायल-इराण, रशिया-युक्रेन युद्धादरम्यान किम जोंग-उनची आण्विक हल्ल्याची धमकी, ‘या’ देशाची चिंता वाढली

खोमेनींचा इस्रायलला इशारा

गेल्या आठवड्यात इस्रायलने लेबनॉनमध्ये एअर स्ट्राइक करून हेझबोलाचा प्रमुख हसन नसरल्लाह याला ठार केलं. त्यानंतर हेझबोला व इराणने इस्रायलवर शेकडो क्षेपणास्रं डागली. इस्रायल सध्या हमास, हेझबोला व इराणशी लढत आहे. अशातच इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह खोमेनी यांनी आज पाच वर्षांमध्ये पहिल्यांदाच नमाज पठणानंतर सार्वजनिकरित्या लोकांना संबोधित केलं. यावेळी त्यांनी इस्रायलला निर्वाणीचा इशारा दिला.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Israel removes indian map wrongly showed jammu kashmir in pakistan reuven azar asc