इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमाविरोधात कारवाई करण्यासाठी आम्ही संयुक्त राष्ट्रांवर अवलंबून नसून तशी कारवाई करण्यास आम्ही सक्षम आहोत, असे सांगत इराणविरोधात पावले उचलण्याचे संकेत इस्रायलचे संरक्षणमंत्री मोशे यालोन यांनी दिले आहेत. यालोन यांनी याप्रकरणी अमेरिकेवरही शरसंधान केले आहे.

इराणविरोधात कारवाईसाठी खरे म्हणजे अमेरिकेने पुढाकार घ्यावा, असे आम्हाला वाटते. परंतु तसे काही न होता अमेरिकेने इराणशी चर्चा सुरू केली आहे, याकडे यालोन यांनी लक्ष वेधले. या चर्चेत इराणचा पुढाकार जास्त आहे. मात्र, असे असले तरी आम्हाला आमच्यापुरते बघावेच लागेल, असेही यालोन म्हणाले.
यालोन यांच्या या वक्तव्यांना त्यांच्या कार्यालयाकडून दुजोरा देण्यात आल्याचे वृत्त ‘हारेत्झ’ या इस्रायली वृत्तपत्रामधून मंगळवारी प्रसिद्ध करण्यात आले. परंतु इराणवर इस्रायल हल्ला करील किंवा नाही, यासंबंधी यालोन यांनी काही वक्तव्य केल्याचे कार्यालयाने सांगितले नाही.

Story img Loader