खान युनिस, वृत्तसंस्था

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

इस्रायली सैन्याने दक्षिण गाझामध्ये पत्रके टाकून पॅलेस्टिनींना तो भाग सोडून जाण्यास सांगितले असल्याची माहिती तेथील रहिवाशांनी गुरुवारी दिली. यामुळे इस्रायल आता दक्षिण गाझामध्ये लष्करी कारवाईचा विस्तार करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, इस्रायलच्या फौजांनी उत्तर गाझामधील अल-शिफा या सर्वात मोठय़ा रुग्णालयात शोध मोहीम गुरुवारीदेखील सुरू ठेवली. या रुग्णालयात काही बंदुका सापडल्याचा दावा इस्रायलकडून करण्यात आला. मात्र, रुग्णालयाच्या खाली हमासचा तळ असल्याच्या दाव्याच्या पुष्टय़र्थ त्यांनी कोणतेही पुरावे अद्याप दिलेले नाहीत. रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी हे आरोप फेटाळले आहेत.

इस्रायलने दक्षिण गाझामध्ये लष्करी कारवाई वाढवल्यास तेथील मानवतावादी संकट अधिक तीव्र होण्याची भीती आहे. या भागात इस्रायली सैन्याकडून रोज हवाई हल्ले केले जात आहेत. जमिनीवरील लढाईमुळे परिस्थिती अधिक बिकट होऊ शकते.

हेही वाचा >>> विश्लेषण: गर्भपाताचा हक्क अबाधित राखण्याच्या दृष्टीने अमेरिकेतील घडामोडी महत्त्वाच्या का?

गाझामध्ये आजार, भूक यांचे संकट अटळ

युद्धामुळे गाझा पट्टीमध्ये संसर्गजन्य आजार आणि भूक यांचे संकट अटळ असल्याचा इशारा संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार संघटनेचे अध्यक्ष वोल्कर टर्क यांनी गुरुवारी दिला. गाझामध्ये इंधन संपुष्टात आल्यास सांडपाण्याची व्यवस्था कोसळणे, आरोग्य व्यवस्था कोलमडणे आणि सध्या तुरळक प्रमाणात वितरित होणाऱ्या मदतसामग्रीचा पुरवठा पूर्णपणे थांबणे अशी संकटे ओढवतील असे टर्क म्हणाले.

रुग्णालयांमधील रुग्णांना वाचवण्याचे आव्हान अल-शिफा रुग्णालयात इस्रायली फौजा शिरल्यानंतर तिथे अडकलेल्या रुग्णांच्या सुरक्षिततेबद्दल चिंता वाढली आहे. रुग्णालयातून लहान बाळांसह रुग्णांना दुसरीकडे हलवणे धोकादायक असल्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. केवळ वैद्यकीय सामग्रीचा पुरवठा करून रुग्णांना वाचवता येणार नाही, धुमश्चक्री सुरू असताना त्यांना सुरक्षितपणे दुसरीकडे सुखरूपपणे नेता येणार नाही असे आरोग्य अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.