हमास आणि पॅलेस्टाईन इस्लामिक जिहाद दहशतवादी हल्ल्यांची योजना आखण्यासाठी वेस्ट बँकमधील मशिदीच्या खाली कपाऊंड तयार करण्यात आलं होतं. या कंपाऊंडवर इस्रायलने रविवारी हवाई हल्ला केला आहे. दरम्यान, इस्रायलने गाझा पट्टीवर आपला हल्ला तीव्र करण्याची तयारी केली आहे. गाझा पट्टीतील मृतांची संख्या ४४६९ झाली आहे तर इस्रायलवरील हमासच्या हल्ल्यात १४०० लोक मारले गेले आहेत.

इस्रायल संरक्षण दलाने काही फोटो शेअर केले आहेत. वेस्ट बँकमधील जेनिन निर्वासित शिबिरातील अल-अन्सार मशिदीच्या खाली बंकर असल्याचं या फोटोंमध्ये दाखवण्यात आलं आहे. त्यात अतिरेक्यांनी शस्त्रे कोठे ठेवली होती हे दाखविणारा आकृतीबंधही जारी केला. या ठिकाणी इस्रायलने केलेल्या हल्ल्यात एक पॅलेस्टाईन नागरिकाचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी आहेत.

Viral video Jan Seva Kendra (mini-bank) in Uttar Pradesh's Saharanpur
Robbery in UP Bank : चोरानं समोर येऊन बंदूक रोखून धरली, तरी बँक कर्मचारी फोनवर निवांत बोलत होता! अखिलेश यादव यांची पोस्ट व्हायरल!
IND vs AUS Usman Khawaja Reveals How He Stop Virat Kohli Sam Konstas Fight on Field Melbourne
IND vs AUS: “मी विराटला ओळखतो…,” कॉन्स्टास-कोहलीमध्ये मैदानात…
three KZF terrorist involved in Gurdaspur grenade attack killed
Punjab Grenade Attacks : पंजाबमध्ये ग्रेनेड हल्ला करणारे तीन दहशतवादी एन्काउंटरमध्ये ठार; यूपी आणि पंजाब पोलि‍सांची संयुक्त कारवाई
Firing on saraf shop worker in Shahapur
शहापुरातील सरफच्या दुकानातील कामगारावर गोळीबार
Eknath Shinde On Uddhav Thackeray
Eknath Shinde : “काहीजण आमदारकी वाचवण्यासाठी…”, उपमुख्यमंत्री शिंदेंची उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष टीका
Dombivli Bangladeshi arrested
डोंबिवलीत सहा बांगलादेशी नागरिकांना अटक
5 terrorists killed in Jammu Kashmir
Jammu Kashmir : जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत ५ दहशतवादी ठार, २ जवान जखमी
bangladesh war victory new controversy pakistan surrender
विश्लेषण : ९० हजार सैनिकांसह पाक जनरलची शरणागती… पण बांगलादेश मुक्तीचे ऐतिहासिक चित्र भारतीय लष्करी मुख्यालयातून का हटवले?

दरम्यान, ‘हमास’च्या हल्ल्यानंतर बंद केलेली इजिप्त आणि गाझा पट्टी दरम्यानची सीमा इस्रायलने दोन आठवडय़ांनंतर शनिवारी खुली केली. त्यामुळे युद्धग्रस्त पॅलेस्टिनी नागरिकांसाठी अत्यंत आवश्यक अशा मदत सामुग्रीची वाहने गाझा पट्टीत दाखल झाली. तर सुमारे तीन हजार टन मदत साहित्याची आणखी २०० वाहने इजिप्तची सीमा ओलांडून गाझाकडे निघाली होती. मदत सामुग्रीच्या २० वाहनांना प्रथम इजिप्त सीमेवरून इस्रायलने वेढा दिलेल्या गाझा पट्टीत प्रवेश देण्यात आला असून या वाहनांमध्ये जीवरक्षक साहित्याचा समावेश असल्याचे संयुक्त राष्ट्रांनी म्हटले आहे. तर दुसरीकडे ही मदत सामुग्री गाझामधील मानवी संकटाच्या तीव्रतेच्या तुलनेत तुटपुंजी असल्याचे मदत पथकांतील स्वयंसेवकांनी सांगितले.

गाझामध्ये २३ लाख पॅलेस्टिनी रहिवासी आहेत. त्यांच्यापैकी निम्म्यांनी दक्षिणेकडे स्थलांतर केले आहे. उर्वरित लोक अन्नधान्य पुरवून खात असून अशुद्ध पाणी पीऊन दिवस ढकलत आहेत. तर गाझातील रुग्णालयांमध्ये वैद्यकीय सामग्रीचा आणि जनित्रांसाठी इंधनाचा तुटवडा असल्याचे रुग्णालय सूत्रांनी सांगितले.

हमास’प्रणित सरकारची मागणी

मदत सामुग्रीमध्ये औषधे आणि मर्यादित प्रमाणात अन्नपदार्थाचा समावेश आहे, इंधनाचा नाही. ‘गाझा’तील मानवतेवरील संकट निवारणासाठी ती तुटपुंजी आहे. मदतीचा पुरवठा २४ तास होण्यासाठी सुरक्षा मार्गिका तयार करण्यात यावी, अशी मागणी हमासप्रणीत गाझा सरकारने केली आहे.

बॉम्बहल्ले चालूच

इस्रायलने गाझा पट्टीवर हवाई बाम्ब हल्ले चालूच ठेवले असले तरी पॅलेस्टाईनमधून इस्रायलवर होणारा क्षेपणास्त्रांचा मारा रोखणे त्याला शक्य झालेले नाही. ‘हमास’ने इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा चालूच ठेवला आहे.

Story img Loader