Israel – Palestine War News : इस्रायल आणि हमासमधील युद्धाचा आजचा सातवा दिवस आहे. हे युद्ध संपण्याची चिन्हं सध्यातरी दिसत नाहीत. शनिवारी (७ ऑक्टोबर) हमासच्या दहशतवाद्यांनी इस्रायलवर शेकडो क्षेपणास्रं डागली. हमासच्या क्षेपणास्र हल्ल्याला इस्रायलनेही जशास तसं प्रत्युत्तर दिलं. सात दिवसांपासून इस्रायल आणि हमासमध्ये हवाई युद्ध सुरू होतं. आता इस्रायल गाझा पट्टीत हमासविरोधात जमिनीवरील मोहीम सुरू करण्यासाठी सैन्य सज्ज करत असल्याचे इस्रायलच्या लष्कराकडून सांगण्यात आलं आहे.२४ तासांच्या आत उत्तर गाझा रिकामं करण्याचे आदेश इस्रायलने दिले आहेत. यामुळे जवळपास ११ लाख नागरिकांना गाझातून स्थलांतरीत व्हावं लागणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दरम्यान, या बिकट परिस्थितीत अमेरिकेचं इस्रायलला सहकार्य मिळत आहे. युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे संरक्षण सचिव लॉयड ऑस्टिन आज इस्रायलमध्ये दाखल झाले आहेत. यावेळी अमेरिकेकडून मिळत असलेल्या सहकार्याबद्दल इस्रायलने अमेरिकेचे आभार मानले आहेत.

इस्रायलचे संरक्षणमंत्री योव्ह गॅलेन्ट यांनी अमेरिकेचे संरक्षण सचिव लॉयड ऑस्टिन यांच्यासमोर अमेरिकेचे आभार मानले. यावेळी गॅलेन्ट म्हणाले, तुम्ही म्हणाला होता की अमेरिका परिस्थितीत इस्रायलबरोबर उभी आहे, म्हटलं त्याप्रमाणे तुम्ही दाखवून दिलंत. तुम्ही आता खरोखर आमच्याबरोबर उभे आहात. एक सहकारी असण्याचा अर्थ काय असतो, ते तुम्ही दाखवून दिलंय. मित्र काय असतो? भाऊ कसा असतो? ते तुम्ही दाखवून दिलंय.

हे ही वाचा >> “…तर १०,००० कोटी रुपये वाचले असते”, मेट्रो कार डेपोच्या कंत्राटावरून आदित्य ठाकरेंचा शिंदे सरकारवर आरोप

योव्ह गॅलेन्ट म्हणाले, मी लॉयड ऑस्टिन यांना आपल्या प्रदेशातील धोरणात्मक घडामोडींची माहिती दिली. त्यचबरोबर आयडीएफ प्रमुखानी सीमेवरील घडामोडींची माहिती दिली. या परिस्थिती आपल्याला पेंटागॉन आणि व्हाईट हाऊसकडून बरीच मदत मिळत आहे. आज आपल्याला लढाऊ विमानांची दुसरी तुकडी मिळेल. हे स्वातंत्र्य आणि मुल्यांसाठीचं युद्ध आहे. या युद्धात आपण आघाडीवर आहोत. आम्ही लढत राहू आणि हे युद्ध जिंकू.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Israel thanks usa for help yoav gallant says you have shown what means to be an ally amid war with hamas asc