इस्रायलने दक्षिण गाझामधून आपलं सैन्य माघारी बोलवण्याचा निर्णय घेतला आहे. रविवारी इस्रायलच्या सैन्यांनी याबाबत माहिती दिली. महत्त्वाचे म्हणजे मागील काही दिवसांत इस्रायलने गाझापट्टीतून मोठ्या प्रमाणात सैन्य माघारी बोलवले आहे. त्यानुसार आता खान युनिस शहरातूनदेखील सैन्याची शेवटची तुकडी माघारी बोलवण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

इस्रायली सैन्याने म्हटले की, दक्षिण गाझामध्ये सैन्य तैनात करण्याचा उद्देश पूर्ण झाला आहे. त्यामुळे भविष्यातील अभियानाच्या तयारीसाठी आम्ही येथील सैन्य माघारी बोलवण्याचा निर्णय घेतला आहे. इस्रायली सैन्याची शेवटची तुकडी खान युनिस शहरातून बाहेर पडली आहे. याशिवाय इस्रायली सैन्याने स्पष्ट केल आहे, की दक्षिण गाझामधून सैन्य माघारी बोलवण्याचा निर्णय घेतला असला, तरी गाझा पट्टीतील इतर भागात काही सैन्य तैनात राहणार आहेत.

हेही वाचा – विमानतळ अणूबॉम्बने उडवून देण्याची धमकी, गुजरातच्या दोघांना दिल्लीत अटक

महत्त्वाचे म्हणजे इस्त्रायलने चार महिन्यापूर्वी खान युनिस शहरावर ताबा मिळवला होता. त्यावेळी इस्त्रायलच्या धोरणांवर अनेकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. इस्त्रायलच्या या निर्णयाकडे दक्षिणेकडील रफाह शहर ताब्यात घेण्याचा प्रयत्न म्हणून बघण्यात आले होते. विशेष म्हणजे या शहरातून जवळपास १० लाख लोकांनी युद्धाच्या भीतीने स्थलांतर केले आहे.

हेही वाचा – VIDEO : मध्य प्रदेशमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या रोड शोदरम्यान स्टेज कोसळला, पोलिसांसह चारजण जखमी!

दरम्यान, ज्यावेळी खान युनिस शहरातून सैन्य बाहेर पडले, त्यावेळी इस्त्रायली सैन्य हाय अलर्टवर होते. कारण त्यावेळी इराणकडून हल्ला होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. महत्त्वाचे म्हणजे इराणने हल्ला केल्यास त्यांना जशास तसं प्रत्युत्तर देण्यात येईल, असे इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी म्हटले होते.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Israel withdraws troops from southern gaza know the reasons spb
Show comments