इस्रायल आणि हमास यांच्यात चालू असलेल्या युद्धाबाबत संजय राऊतांनी केलेल्या एक्स पोस्टवरून इस्रायलने शुक्रवारी संताप व्यक्त केला. इस्रायली दुतावासाने यासंदर्भात परराष्ट्र मंत्रालय आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहिले. या पत्रात त्यांनी संजय राऊतांच्या एक्स पोस्टबाबत कडक शब्दांत टीका केली आहे. इंडिया टुडेने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, १४ नोव्हेंबर रोजी संजय राऊत यांनी इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धामुळे गाझातील परिस्थिती विषद करणारी एक बातमी एक्सवर (पूर्वीचे ट्विटर) पोस्ट केली होती. या पोस्टवर कमेंट करताना त्यांनी “हिटलर ज्यूंचा इतका तिरस्कार का करत होते, हे आता समजतंय का?” असं म्हटलं होतं. त्यांच्या या एक्स पोस्टवरून प्रचंड गदारोळ झाला. त्यामुळे त्यांना ही पोस्ट तत्काळ डिलिट करावी लागली. परंतु, ही पोस्ट इस्रायलच्या दुतावासांपर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केली असून त्यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहिलं आहे.

संजय राऊतांनी कोणती बातमी पोस्ट केली होती?

इस्रायलने गाझातील अल शिफा रुग्णालयाला लक्ष्य केलं आहे. या रुग्णालयात हमास या दहशतवादी संघटनेचे दहशतावादी लपले असून इस्रायलच्या ओलिसांनाही तिथंच डांबून ठेवल्याचा इस्रायलचा दावा आहे. त्यामुळे इस्रायलने या रुग्णालयाभोवती वेढा घातला आहे. यामुळे या रुग्णालयातील महिला आणि नवजात बालकांची गैरसोय होत असल्याबाबतची बातमी संजय राऊतांनी एक्सवर पोस्ट केली होती, असं इंडिया टुडेने वृत्ता म्हटलं आहे.

संजय राऊत काय म्हणाले?

“एक जबाबदार लोकप्रतिनिधी या नात्याने भारत सरकारची इस्रायल गाझा संघर्षाच्या संदर्भात जी भूमिका आहे तीच माझी भूमिका असून मी मांडत आलो आहे. मात्र इस्रायलकडून या संघर्षात गाझा पट्टीतील लहान मुलांची हत्या झाली तेव्हा मी इस्रायलवर टीका केली आहे. हे वगळता इस्रायल प्रकरणी माझी भूमिका वेगळी नाही”, अशी प्रतिक्रिया संजय राऊतांनी लोकसत्ताशी बोलताना दिली.

शस्त्रसंधी शुक्रवापर्यंत लांबणीवर

इस्रायल आणि हमासदरम्यान युद्धादरम्यान चार दिवसांचा विराम  शुक्रवापर्यंत लांबवणीवर पडला आहे. यासंबंधीचा निर्णय बुधवारी जाहीर करण्यात आल्यानंतरही गाझा पट्टीतील धुमश्चक्री थांबलेली नाही. आधी जाहीर करण्यात आलेल्या निर्णयानुसार, गुरुवारी स्थानिक वेळेनुसार सकाळी विराम लागू होणार होता.दुसरीकडे, ओलिसांच्या सुटकेसाठी वाटाघाटी अजूनही सुरू आहेत आणि त्यामध्ये प्रगती होत आहे, अशी माहिती इस्रायलच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांनी दिली. 

युद्धामध्ये सामान्यांची मोठी जीवितहानी

हमासने ७ ऑक्टोबरला केलेल्या हल्ल्यामध्ये इस्रायलमधील १,२०० जणांचा मृत्यू झाला आणि त्यांनी २४० जणांना ओलीस धरले. तर गाझामधील आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार १४ हजारांपेक्षा जास्त पॅलेस्टिनींचा इस्रायलच्या हल्ल्यांमध्ये मृत्यू झाला आहे.

गाझा पट्टी मुलांसाठी सर्वात धोकादायक

युनिसेफने गुरुवारी दिलेल्या माहितीनुसार इस्रायलने ८ ऑक्टोबरपासून गाझा पट्टीवर केलेल्या हवाई हल्ल्यांमध्ये, म्हणजेच गेल्या ४६ दिवसांमध्ये ५,३०० पेक्षा जास्त पॅलेस्टिनी मुलांचा मृत्यू झाला. गाझा पट्टी हा लहान मुलांसाठी सर्वात धोकादायक प्रदेश असल्याचे युनिसेफने जाहीर केले आहे.