लेबनॉनमधील हेजबोलानंतर इस्रायलने आता येमेनमधील हुथी बंडखोरांवर जोरदार हवाई हल्ला आहे. इस्रायलकडून हुथी बंडखोरांच्या ठिकाणांवर मोठ्या प्रमाणात क्षेपणास्त्र डागण्यात आली आहेत. या हल्ल्यात १०० पेक्षा अधिक हुथी बंडखोरांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. खरं तर गेल्या काही दिवसांपासून इस्रायल सैन्य आणि लेबनॉनमधील हेजबोला यांच्यात संघर्ष सुरू आहे. दोघांकडूनही एकमेकांवर हल्ले केले जात आहेत. या हल्ल्यात शनिवारी हेजबोलाचा प्रमुख हसन नसरल्लाहचाही मृत्यू झाला आहे. त्यानंतर आज इस्रायलने हुथी बंडखोरांवरही हवाई हल्ला केल्याची माहिती आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘द इंडियन एक्सप्रेस’ने दिलेल्या वृत्तानुसार, इस्रायली सैन्यांनी येमेनमधील होदेदाह बंदरासह काही वीज निर्मिती प्रकल्पांना लक्ष्य केलं आहे. मीडिया रिपोर्टनुसार होदेदाह हे बंदर हुथी बंडखोरांचा गड मानला जातो. या बंदरावरून हुथी बंडखोरांकडून शस्रांची तस्करी केली जात असल्याची माहिती आहे. तसेच हुथी बंडखोर याच बंदरावरून संपूर्ण लाल समुद्रावर लक्ष ठेऊन असतात, असही सांगितलं जात आहे. इस्रायलपासून हे बंदर जवळपास १८०० किलोमीटर दूर आहे.

हेही वाचा – Israel Hezbollah War : इस्रायलचा हेजबोलावर घाव! हवाई हल्ल्यात दहशतवादी हसन नसराल्लाहचा खात्मा; IDF ची माहिती

दरम्यान, इस्त्रायल डिफेन्स फोर्सेस (आयडीएफ) ने शुक्रवारी लेबनॉनची राजधानी बेरूतमधील हेजबोलाच्या मुख्यालयावर आणखी एक प्राणघातक हवाई हल्ला केला. या हल्ल्यात इराण-समर्थित दहशतवादी गटाचा प्रमुख सय्यद हसन नसराल्लाह याचा मृत्यू झाला आहे. यासह इस्रायलच्या हल्ल्यात चार इमारती उद्ध्वस्त झाल्या. तसेच जीवितहानीही झाली आहे.

हेही वाचा – लेबनॉनशी युद्धविरामाची अमेरिकेची सूचना इस्रायलनं फेटाळली; सर्वशक्तिनिशी हेजबोलाशी लढण्याचे लष्कराला आदेश!

नसराल्लाहच्या मृत्यूनंतर इराणचे विदेश मंत्री अब्बास अराक्ची यांनी प्रतिक्रिया देत नसराल्लाहच्या मृत्यूचा बदला घेतला जाईल, असा इशारा दिला आहे. पुढे बोलताना याप्रकरणी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची आपत्कालीन बैठक बोलावण्याची मागणी केल्याचेही त्यांनी सांगितलं आहे. तर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी नसराल्लाहचा मृत्यू ऐतिहासिक घटना असल्याचे म्हटलं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Israeli air force launches attacks on houthi targets in yemen spb