हमास या दहशतवादी गटाकडून शनिवारी, ७ ऑक्टोबरला इस्रायलवर हल्ला करण्यात आला. अनपेक्षितपणे घडलेल्या या हल्ल्यानंतर इस्रालयकडून प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. या हल्ल्यात पॅलेस्टाईन आणि इस्रायलमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून, मृतांची संख्या तीन हजारांच्यावरती गेली आहे. अशातच इस्रायल आणि हमासच्या युद्धाचं लोन चीनमध्येही पोहचलं आहे. चीनमधील इस्रायली राजदूतावर चाकूनं हल्ला झाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

चीनची राजधानी बीजिंग येथे इस्रायली राजदूतावर शुक्रवारी हा हल्ला झाला. यानंतर राजदूताला रूग्णालयात दाखल करण्यात आल्याचं परराष्ट्र मंत्रालयाकडून सांगण्यात आलं. पण, चीननं अद्यापही हल्ल्याबाबत कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही. तसेच, हल्ल्याचं कारणंही समोर आलं नाही.

हेही वाचा : “भाऊ असावा तर असा”, इस्रायलने मानले अमेरिकेचे आभार; संरक्षणमंत्री म्हणाले, “तुम्ही दाखवून दिलं…”

इस्रायली परराष्ट्र मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनात म्हटलं, “हा हल्ला दूतावासाच्या परिसरात झाला नाही. हल्ल्यानंतर राजदूतास तातडीनं रूग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. हा हल्ला कशामुळे झाला? याचा तपास संबंधित अधिकारी करत आहेत.”

राजदूताची ओळख सार्वजनिक करण्यात आली नाही. हल्ल्यानंतर हल्लेखोरानं तिथून धूम ठोकली आहे. या हल्ल्याचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

हेही वाचा : “इस्रायलनं गाझावर जमिनीवरील हल्ले केल्यास…”, व्लादिमीर पुतिन यांचा इशारा

दरम्यान, इस्रालयकडून गाझावर करण्यात आलेल्या हल्ल्यामध्ये बळींची संख्या १७९९ वर गेल्याची माहिती पॅलेस्टाईनच्या आरोग्य विभागानं दिली. यामध्ये ५८३ बालके आणि ३५१ महिलांचा समावेश आहे. तर, ७३८८ नागरिक जखमी झाले आहेत. त्यात १९०१ बालके आणि ११८५ महिलांचा समावेश असल्याचं आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. तर, हमासच्या दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात इस्रायलमधील १३०० हून अधिक जणांचा बळी गेला आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Israeli diplomat stabbed in full public view in beijing china ssa