इंधनाविना रुग्णालयांची अवस्था बिकट; रक्तदानाचे आवाहन

गाझा, जेरुसलेम : इस्रायल आणि हमास यांच्यादरम्यान सुरू असलेल्या युद्धाच्या १७व्या दिवशी, म्हणजे सोमवारी पहाटे इस्रायलने गाझा पट्टीवर पुन्हा हवाई हल्ले केले. आपण गाझातील दहशतवादी संघटनेच्या ठिकाणांना लक्ष्य करत असल्याचे इस्रायलचे म्हणणे आहे. तर इस्रायलने कोणतीही पूर्वसूचना न देता निवासी भागावर हवाई हल्ले केले. त्यामध्ये १८२ मुलांसह ४३६ पॅलेस्टिनींचा मृत्यू झाल्याची माहिती गाझाच्या आरोग्य मंत्रालयातर्फे देण्यात आली.

गाझा पट्टीवर भूमार्गे आक्रमण करण्यासाठी इस्रायली लष्कर सीमेवर सज्ज आहे. ही लष्करी कारवाई लवकरच सुरू होईल अशी शक्यता आहे. त्यापूर्वी इस्रायलने संपूर्ण गाझा पट्टीत हवाई हल्ले केले. त्याबरोबर पश्चिम किनारपट्टी, सीरिया आणि लेबनॉन येथेही हल्ले सुरू ठेवल्यामुळे युद्धाची व्याप्ती वाढण्याची भीती आहे. 

Hamas-Israel armistice in Gaza after 15 months of intense war
हमास-इस्रायल दरम्यान गाझात युद्धविराम… पश्चिम आशियात आता तरी शांतता नांदेल?
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
industries minister uday samant proposed bhaskar jadhav to join shinde shiv sena
भास्कर जाधव यांना शिंदे गटाचा थेट प्रस्ताव; रत्नागिरी जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग
israel hamas agree to ceasefire conflict in gaza to end after 15 months
इस्रायल-हमास युद्धविरामास सहमती; १५ महिन्यांनंतर गाझामधील संघर्ष थांबणार
Naga Sadhus Enchant Devotees At Triveni Sangam on Makar Sankranti
संक्रातीच्या मुहूर्तावर ‘अमृत स्नान’; नागा साधूंना पहिला मान; त्रिवेणी संगमावर भाविकांचा महापूर
Israel Hamas War reuters
इस्रायल-हमासमधील युद्ध आज थांबणार? कतारचे मध्यस्थीचे प्रयत्न; युद्धबंदीसाठी प्रस्ताव
Nashik Rural Local Crime Branch arrested burglary and loot gang
हरसूल, त्र्यंबकेश्वर भागात घरफोडी करणारी टोळी ताब्यात
accident on flyover in Nashik, Four people died accident Nashik,
नाशिकमध्ये उड्डाणपुलावरील अपघातात पाच जण मृत्युमुखी, १३ जखमी

हेही वाचा >>> VIDEO: “माझं संपूर्ण कुटुंब संपलं, आता मी कशी जगू”, आईचा मृतदेह पाहताच गाझातील मुलीचा आक्रोश

दुसरीकडे, इजिप्तमधून गाझा पट्टीत मदत सामग्री घेऊन येणाऱ्या वाहनांसमोर हवाई हल्ले चुकवत येण्याचे आव्हान आहे. या ट्रकमध्ये अन्न, पाणी आणि वैद्यकीय सामग्री आहे. मात्र, गाझामधील पाणी व सांडपाणी व्यवस्था चालवण्यासाठी तसेच रुग्णालयांसाठी अत्यावश्यक असलेल्या इंधनाला मात्र इस्रायलने परवानगी दिलेली नाही. त्यामुळे रुग्णालयात अपुऱ्या दिवसांची बाळे ठेवण्यासाठी आवश्यक असलेल्या इनक्युबेटरचा वीजपुरवठा कधीही खंडित होऊन ती बाळे मरण पावण्याची भीती आहे.

दरम्यान, गाझाच्या आरोग्य मंत्रालयाने सोमवारी दिलेल्या माहितीनुसार, २,०५५ मुलांसह ५,०८७ लोकांचा मृत्यू झाला आहे. त्याबरोबर १५,२७३ जखमी झाले आहेत.

मदतीसाठी युरोपीय महासंघ प्रयत्नशील

गाझाला इंधनासारखी महत्त्वाची मदत पोहोचवण्याचे मार्ग शोधण्यासाठी युरोपीय महासंघाच्या मंत्री चर्चा करत आहेत. युरोपीय महासंघाच्या परराष्ट्र धोरणाचे प्रमुख जोसेफ बोरेल म्हणाले की, वीज व पाणीपुरवठा सुरळीत करण्यास प्राधान्य दिले पाहिजे. त्याशिवाय रुग्णालये काम करू शकत नाहीत.

युद्धनियमांचे पालन करण्याचे आवाहन

या युद्धादरम्यान इस्रायलला असलेला पाठिंबा कायम असल्याचे जागतिक नेत्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले. त्याच वेळी, सामान्य नागरिकांचे संरक्षण करण्यासह युद्धनियमांचे पालन करण्याचेही आवाहन अमेरिका, कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली आणि ब्रिटनने केले.

हेजबोलाला युद्धात न पडण्याचा इशारा

लेबनॉनमधून कारवाया करणाऱ्या हेजबोला या दहशतवादी संघटनेने युद्धामध्ये पडू नये असा इशारा इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांनी दिला. त्यांनी लेबनॉनच्या सीमेवर तैनात असलेल्या इस्रायली सैन्याची भेट घेतली. या युद्धादरम्यान हेजबोला आणि इस्रायलच्या सैन्यादरम्यान अनेकदा चकमकी घडल्या आहेत.

रक्तदानाचे आवाहन

गाझामधील रुग्णालयांमध्ये औषधांबरोबरच रक्ताचाही तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे तेथील आरोग्य मंत्रालयाने लोकांना रक्तदानाचे आवाहन केले आहे. तसेच रेड क्रॉसलाही रक्तपुरवठा करण्याची विनंती केली आहे.

गाझापट्टीत १४ लाख विस्थापित

युद्ध सुरू झाल्यापासून गाझाच्या २३ लाख लोकसंख्येपैकी तब्बल १४ लाख लोक विस्थापित झाले आहेत, अशी माहिती संयुक्त राष्ट्रांतर्फे देण्यात आली. यापैकी बऱ्याच जणांनी संयुक्त राष्ट्रांच्या आपत्कालीन निवाऱ्यांमध्ये आश्रय घेतला आहे. त्यामुळे तिथे मोठय़ा प्रमाणात गर्दी झाली आहे.

Story img Loader