Israel – Hamas News in Marathi : गाझा शहरातील अल-अहली रुग्णालयावर मंगळवारी रात्री झालेल्या बॉम्बस्फोटात ५०० हून अधिक नागरिकांचा जीव गेला आहे. परंतु, हा स्फोट कोणी घडवून आणला यावरून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. इस्रायलच्या हवाई हल्ल्यांनीच हा स्फोट झाल्याचा आरोप हमासने केला. मात्र इस्रायलने तातडीने हा आरोप फेटाळून लावला. ‘इस्लामिक जिहाद’ या पॅलेस्टिनी अतिरेकी संघटनेने डागलेले रॉकेट दिशा भरकटून रुग्णालयावर आदळले असा दावा इस्रायलच्या सैन्याकडून करण्यात आला. इस्रायलच्या हवाई हल्ल्याने हा स्फोट झाला असता तर घटनास्थळी मोठा खड्डा पडला असता. मात्र, असा कोणताही खड्डा तिथे पडलेला नाही असे लष्कराच्या प्रवक्त्यांनी सांगितले. तसंच, इस्रायलने स्फोटाआधीचे आणि स्फोटानंतरचे व्हिज्युअल्स सादर केले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >> “९/११ च्या हल्ल्यानंतर आम्ही रागाच्या भरात…”,बायडेन यांचं मोठं वक्तव्य, नेतन्याहूंना सल्ला देत म्हणाले…

इस्रायलच्या लष्कराने बुधवारी सकाळी यासंबंधी खुलासा केला. सैन्य त्या भागात हवाई हल्ला करत नव्हते असे लष्कराचे प्रवक्ते रिअर अ‍ॅडमिरल डॅनियल हगारी यांनी सांगितले. हा स्फोट झाला तेव्हा, स्थानिक वेळेनुसार संध्याकाळी ६:५९ वाजता, ‘इस्लामिक जिहाद’ या पॅलेस्टिनी अतिरेकी गटाने जवळच्या दफनभूमीतून रॉकेट डागल्याची इस्रायलच्या रडारने नोंद केल्याची माहिती हगारी यांनी दिली. तसंच, इस्रायलच्या संरक्षण दलाने X या समाजमाध्यमावर एक व्हिडीओ पोस्ट करून हा दावा खोडून काढला आहे. स्फोटाआधी आणि स्फोटानंतरचे चित्रण त्यांनी या पोस्टद्वारे शेअर केले आहेत.

इस्रायलच्या हवाई हल्ल्याने हा स्फोट झाला असता तर घटनास्थळी मोठा खड्डा पडला असता, असा दावा करत रुग्णालय इमारतीवर कोणताही खड्डा किंवा इतर कोणतीही हानी झाल्याचं व्हिडीओमध्ये दिसत नसल्याने इस्रायली संरक्षण दलाने म्हटलंय. तसंच, इस्रायलने स्फोट घडवून आणला असता तर कशाप्रकारे खड्डा पडला असता त्याचेही उदाहरण व्हिडीओच्या माध्यमातून देण्यात आलं आहे.

हेही वाचा >> गाझाला इजिप्तमार्गे मदत शक्य; बायडेन यांची मध्यस्थी

स्फोट झालेल्या अल-अहली रुग्णालयात रुग्ण आणि युद्धामध्ये जखमी झालेल्या लोकांवर उपचार सुरू होते. त्याशिवाय अनेक सामान्य लोकांनी इस्रायलच्या हवाई हल्ल्यांपासून वाचण्यासाठी या रुग्णालयात आसरा घेतला होता. या स्फोटानंतर रुग्णवाहिका आणि खासगी वाहनांतून जवळपास ३५० जणांना गाझा शहरातील अल-शिफा या मुख्य रुग्णालयात हलवण्यात आले. या रुग्णालयात युद्धात जखमी झालेल्यांची आधीच गर्दी होती.रुग्णालयावरील स्फोटामुळे पश्चिम आशियाई देशांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. इस्रायल आणि हमासदरम्यानच्या युद्धामुळे संपूर्ण प्रदेश युद्धाकडे ढकलला जात आहे, अशी भीती जॉर्डनचे परराष्ट्रमंत्री आयमान सफादी यांनी व्यक्त केली.