गेल्या शनिवारी (७ ऑक्टोबर) पॅलेस्टाईनमधील दहशतवादी संघटना हमासने गाझापट्टीतून इस्रायलवर रॉकेट हल्ला केल्यानंतर दोन्ही देशांमध्ये युद्ध पेटलं आहे. यानंतर इस्रायलने युद्धाची घोषणा करत गाझापट्टीपर प्रचंड बॉम्बवर्षाव केला आहे. इस्रायल-हमास संघर्षात आतापर्यंत हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे. तर असंख्य लोक जखमी झाले आहेत. हे युद्ध सुरू असताना शनिवारी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी गाझापट्टी सीमेवर जाऊन इस्रायल संरक्षण दलाच्या जवानांची भेट घेतली. यावेळी त्यांनी सैन्यांचं मनोबल वाढवलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

याबाबतचा एक व्हिडीओ इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) खात्यावरून शेअर केला आहे. ज्यामध्ये ते इस्रायल संरक्षण दलाच्या जवानांशी संवाद साधताना दिसत आहेत. संबंधित व्हिडीओ शेअर करताना इस्रायली पंतप्रधानांनी “आम्ही सर्व तयार आहोत” असं म्हटलं आहे.

हेही वाचा- इस्रायलने युद्धात पांढरा फॉस्फरस’ वापरल्यामुळे टीका का होतेय?

‘एक्स’वर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू आपल्या जवानांना पुढील आव्हानासाठी तयार राहण्याविषयी सूचना देताना दिसत आहेत. “तुम्ही पुढील आव्हानासाठी तयार आहात का? युद्धाचा पुढचा टप्पा लवकरच येतोय,” असा संवाद बेंजामिन नेतन्याहू आपल्या सैनिकांशी करताना दिसत आहे. त्यामुळे युद्धाचा पुढील टप्पा नेमका काय असणार? यावरून तर्कवितर्क लढवले जात आहेत.

शनिवारी (७ ऑक्टोबर) हमासने ‘ऑपरेशन अल अक्सा फ्लड बॅटल’ची घोषणा करत इस्रायलवर हल्ला चढवला होता. याचा बदला म्हणून इस्रायलने ‘ऑपरेशन आयर्न स्वॉर्ड्स’ची घोषणा केली. हमास-इस्रायलच्या युद्धात दोन्ही देशातील ३२०० हून अधिक लोकांचा जीव गेला आहे. तर गाझा पट्टीत १९०० पॅलेस्टिनी लोकांचा मृत्यू झाला असून यामध्ये सुमारे ७०० लहान मुलं असल्याचं ‘युनिसेफ’ने म्हटलं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Israeli pm benjamin netanyahu interacted with israel defense forces gaza strip rmm