देशात मान्यता नसलेली गोष्ट केली की मग कोणालाही शिक्षेतून सुटका नाही. याचा प्रत्यय नुकताच आला. इस्त्राईलचे पंतप्रधान असलेल्या बेंजामिन नेतान्याहू यांच्या मुलाने सोशल मीडियावर एक आक्षेपार्ह पोस्ट केल्यानंतर त्याचे फेसबुक अकाऊंट काही काळासाठी बॅन करण्यात आले. या मुलाचे नाव याइर असून त्याचे फेसबुक अकाऊंट २४ तासांसाठी बॅन करण्यात आले. पॅलिस्टाइनमध्ये हल्ला झाल्यानंतर त्याने आपल्या फेसबुक वॉलवर लिहीले, सर्व मुस्लिमांनी इस्त्राईल सोडा असे त्याने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. पुढे तो म्हणतो, तुम्ही आयलँड किंवा जपान याठिकाणी कधी हल्ले झाल्याचे तुम्ही पाहिलंय? नाही, कारण याठिकाणी मुस्लिम लोक नाहीत.
बेंजामिन यांचा मोठा मुलगा असलेला याइर पुढे म्हणतो, ”याठिकाणी शांती कशी राहील? एकतर यहूदींनी देश सोडायला हवा नाहीतर मुस्लिमांनी. मला वाटते दुसरा पर्याय जास्त चांगला आहे. मागील आठवड्यात एका बस थांब्यावर दोन सैनिकांची गोळी मारुन हत्या करण्यात आली. त्यानंतर नेतान्याहू यांच्या मुलाने ही पोस्ट केली आहे. फेसबुककडून ही वादग्रस्त पोस्ट डिलिट करण्यात आली आहे. त्यामुळे देशात कोणीही अशाप्रकारचे कृत्य केल्यास त्याला क्षमा नाही हे या कारवाईवरुन स्पष्ट झाले आहे. धर्मविरोधी पोस्ट सोशल मीडियावर करण्याने दोन समाजातील संघर्ष वाढण्याची शक्यता असल्याने या कारवाईकडे अतिशय गांभीर्याने पाहिले जात आहे.