इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध टोकाला पोहोचलंय. हमासविरोधातील रणनीती मागे घेण्यास इस्रायलने नकार दिलाय. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नरसंहार सुरू आहे. हमासकडून अनेक महिलांवर बलात्कार केले गेल्याचे वृत्त अनेक माध्यमातून समोर आलं आहे. तर, इस्रायली सैनिकांकडून पॅलेस्टानी नागरिकांवर बलात्कार झाले नव्हते का? असा सवाल एका इतिहासाच्या शिक्षकाने विचारला आहे. त्याच्या या प्रश्नामुळे त्याला पोलिसांनी अटक केली आहे.

पेताह टिकवा या मध्यवर्ती शहरातील एका शाळेत हा शिक्षक इतिहास शिकवत होता. त्यांच्या इतर शिक्षकांच्या ग्रुपमध्ये त्याने असे वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. “इस्रायली सैनिकांनी पॅलेस्टिनींवर बलात्कार केले नाहीत? ते १९४८ पासून करत आहेत, आणि म्हणून या गोष्टी पाठ्यपुस्तकांमध्ये नाहीत”, असं या शिक्षकाने म्हटलं. हे प्रकरण उजेडात आल्यानंतर पेताह टिकवा पालिका आणि शिक्षण मंत्रालयाने या शिक्षकाला शाळेतून काढून टाकलं आहे. तसंच, इतर अनेक प्रकरणात या शिक्षकाकडून हमासचं समर्थनही झालं आहे.

hinganghat zilla parishad
वर्धा : निलंबित शिक्षक पुन्हा निलंबित…
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Bopapur school, Bopapur teacher suspended ,
अजबच! दोन शिक्षक मारामारी करतात आणि विद्यार्थ्यास बदडतात, अखेर निलंबित ?
Arvi , Shivaji Primary School, Padma Chaudhary,
अशीही एक ‘मॅडम’ ! घर समजून शाळेचं रुपडंच बदलले
class 6 girl school raped in Porbandar
शिक्षकाचा सहावीतल्या विद्यार्थीनीवर बलात्कार; वाच्यता केल्यास खिडकीतून फेकण्याची दिली होती धमकी
Ajit Pawar
Ajit Pawar : “जर कुणी खंडणी मागितली तर…”, अजित पवारांनी बीडमध्ये स्पष्टच सांगितलं; म्हणाले, “काही लोक रिवॉल्व्हर…”
daund taluka , school girl rape contract ,
धक्कादायक! विद्यार्थिनीवर बलात्कार आणि खून करण्यासाठी विद्यार्थ्याने दिली १०० रुपयांची सुपारी
MLA Ravi Rana On Uddhav Thackeray
Ravi Rana : “उद्धव ठाकरे अन् देवेंद्र फडणवीसांची छुपी रणनीती”, ‘या’ नेत्याचा मोठा दावा; म्हणाले, “लवकरच…”

हेही वाचा >> जो बायडेन यांच्या नातीच्या कारवर हल्ला? सिक्रेट एंजट्सकडून गोळीबार, नेमकं प्रकरण काय?

या शिक्षकाने पूर्वी दहशतवादाला पाठिंबा दर्शविला होता आणि सुरक्षा दलांचीही बदनामी केली होती. त्याने एका दहशतवाद्याचा गौरवही केला. तसंच, पोलीस आणि सैनिकांवर हल्ले करण्यास प्रोत्साहन देणार्‍या पोस्टही शेअर केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. या शिक्षकाने एकदा इस्रायली हवाई दलाच्या वैमानिकांना “बाल खुनी” संबोधले होते. तसंच, लष्करात सेवा न करण्याचे आवाहन त्याने विद्यार्थ्यांना केले होते.

“आम्ही हे प्रकरण गांभीर्याने घेतलं आहे. कारण, शाळेत इतिहास शिकवणाऱ्या इतिहासाच्या शिक्षकाकडूनच इतिहासाचा विपर्यास केला जातोय. आयडीएफ वैमानकांना खुनी म्हटलं जातंय, शत्रूंच्या कृतींचं समर्थन केलं जातंय, युद्धाच्या वेळी शत्रूला मदत केली जातेय”, असं पोलिसांनी एका निवेदनात म्हटलं आहे.

Story img Loader