एपी, तेल अवीव
इस्रायलने गाझाच्या उत्तरेकडे केलेल्या हल्ल्यात २२ जणांचा मृत्यू झाला. यात ११ महिला आणि दोन मुलांचा समावेश आहे. पॅलेस्टिनी अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. इस्रायलचा गाझाच्या उत्तरेकडे गेल्या तीन आठवड्यांपासून हल्ला सुरू आहे. इस्रायलने मात्र दहशतवाद्यांना लक्ष्य करीत असल्याचा दावा केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अन्य एका घटनेत, तेल अवीव शहरात एका बसस्थानकाजवळ ट्रकच्या अपघातात ३५ जखमी झाले. अपघाताचे सविस्तर वृत्त समजले नसले, तरी गेल्या काही वर्षांपासून पॅलेस्टिनी इस्रायलमध्ये वाहन धडकावून अपघाताचे तंत्र वापरत आहेत. इस्रायलच्या मोसाद या गुप्तचर संस्थेच्या मुख्यालयाजवळच ही घटना घडली.

हेही वाचा : Israel Attack on Iran: इस्रायलचा इराणवर हवाई हल्ला; लष्करी तळांना लक्ष्य केले, पुन्हा युद्ध भडकणार?

u

दरम्यान, इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनी यांनी इस्रायलने इराणवर केलेला हल्ला मोठा करून सांगण्याची गरज नाही किंवा त्याला दुय्यम लेखण्याचीही गरज नाही, असे विधान केले. इराण इस्रायलला प्रत्युत्तर देण्यावर मात्र त्यांनी भाष्य केले नाही. इराणने इस्रायलवर केलेल्या बॅलिस्टिक हल्ल्याला इस्रायलने नुकतेच प्रत्युत्तर दिले.

इराणवरील हल्ल्यामध्ये इराणचे गंभीर नुकसान झाले असून, इस्रालयची उद्दिष्टे पूर्ण झाली आहेत. इराणच्या संरक्षण क्षमतांचे आणि त्यांची क्षेपणास्त्रे आमच्याकडे रोखण्याच्या क्षमतेचे आम्ही मोठे नुकसान केले आहे. – बेंजामिन नेतान्याहू, पंतप्रधान, इस्रायल

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Israeli strike 22 killed in north gaza css