Israel – Hamas News in Marathi : हमासने इस्रायलविरोधात युद्ध सुरू केल्यानंतर इस्रायलनेही हमासला चोख प्रत्युत्तरादाखल जमीन, पाणी आणि हवाई लढाईला जोरदार सुरुवात केली आहे. पॅलेस्टाईनच्या ताब्यात असलेल्या गाझा पट्ट्यातील भागांवर इस्रायलकडून हवाई हल्ले सुरू असतानाच मध्यरात्रीही इस्रायलची विमाने दक्षिण लेबॉननवर हल्ला करत होती. तर, सोमवारी पहाटेही गाझा पट्टीवर हवाई हल्ले करून बॉम्बवर्षाव करण्यात आला. रॉयटर्स या वृत्तसंस्थेने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गाझा पट्टीच्या मध्यभागी आणि उत्तरकडे इस्रायलचे हल्ले केंद्रीत होते, असं पॅलेस्टिनी माध्यमांकडून सांगण्यात आलंय. उत्तर गाझामधील जबलिया निर्वासित छावणीतील घरांवर झालेल्या हल्ल्यात अनेक पॅलेस्टिनी ठार झाले आणि काही जखमी झाल्याचेही वृत्त आहे.

हेही वाचा >> युद्धग्रस्त पॅलेस्टाईनला  भारताकडून मदत रवाना; ४० टन सामुग्री घेऊन विमान इजिप्तकडे

गाझामधील निवासी इमारतीवर इस्रायली हल्ल्यात किमान ३० पॅलेस्टाईन नागरिक ठार झाले आहेत. जबलिया निर्वासित छावणीतील अल-शुहादा भागात ही इमारत होती. या हल्ल्यामुळे इमारत जमिनदोस्त झाली, त्यामुळे आजूबाजूची घरेही उद्ध्वस्त झाली आहेत, इंडिया टुडेने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

हमासची इराणशी चर्चा

दरम्यान,हमासचे नेते इस्माईल हनीयेह आणि इराणचे परराष्ट्र मंत्री होसेन अमीराबडोल्लाहियान यांच्यात रविवारी फोनवरून चर्चा झाली. यावेळी गाझामधील इस्रायलचे क्रूर हल्ले थांबवण्याबाबत चर्चा झाली असल्याचं हमासने एका निवेदनात म्हटलं आहे. इस्रायलने हमास या दहशतवादी संघटनेचा नायनाट करण्याच्या उद्देशाने गाझाच्या सीमेजवळ रणगाडे आणि सैन्य तैनात केले आहे. तसंच, पेंटागॉनने इराण-संलग्न सैन्याकडून होणारे हल्ले रोखण्यासाठी दोन विमानवाहू जहाजे आणि मध्य पूर्वेकडे लक्षणीय प्रमाणात नौदल शक्ती पाठवली आहे.

शुक्रवारीही केला होता हल्ला

इस्रायलने गाझा आणि लेबनॉनच्या सीमाभागातील आपल्या नागरिकांना तेथून हलवले असून त्यांना अन्यत्र वेगवेगळ्या हॉटेलमध्ये ठेवले आहे. किर्यात शामोना हे २० हजारांची वस्ती असलेले गाव रिकामे करण्याचा आदेश संरक्षण मंत्रालयाने दिला. इस्रायलने शुक्रवारी पहाटे जोरदार बॉम्बवर्षांव केला होता. आपण हमासशी संबंधित १००पेक्षा जास्त ठिकाणांवर हल्ला केल्याचे इस्रायलच्या लष्कराने सांगितले होते.

आतापर्यंत किती मृत्यू

गेल्या दोन आठवड्यांपासून सुरू असलेल्या युद्धात इस्रायलच्या हल्ल्यामुळे आतापर्यंत ४६०० नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती गाझाच्या पॅलेस्टाईन समर्थक आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Isreal hamas war update israel strikes gaza lebanon overnight 30 palestines death sgk