Aditya L1 Solar Mission Launch Live Streaming : चांद्रयान-३ ही मोहीम यशस्वी ठरल्यानंतर भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) आता सौरमोहीम हाती घेतली आहे. इस्रो आपलं यान सूर्याच्या दिशेने पाठवणार आहे. आदित्य एल १ असं या सौर मोहिमेला नाव देण्यात आलं आहे. हे अवकाशयान सूर्याचा अभ्यास करेल. सूर्याचं तापमान, अतिनील किरणांचा पृथ्वीवर होणारा परिणाम, ओझोनचा थर, अंतराळातील हवामान, सौरवादळं आणि त्याचा पृथ्वीवर होणारा परिणाम या सर्व गोष्टींचा अभ्यास करण्यासाठी इस्रोने ही सौरमोहीम हाती घेतली आहे. दरम्यान, इस्रोने या अवकाशयानाच्या लाँचिंगची तारीख आणि वेळ जाहीर केली आहे.

यू. आर. राव उपग्रह केंद्रात तयार केलेला उपग्रह दोन आठवड्यांपूर्वी आंध्र प्रदेशातील श्रीहरीकोटा येथील इस्रोच्या स्पेसपोर्टवर पोहोचवण्यात आला आहे. २ सप्टेंबर रोजी पीएसएलव्ही या प्रक्षेपकाद्वारे हा उपग्रह सूर्याच्या दिशेने पाठवला जाईल. सकाळी ११.५० वाजता हे अवकाशयान सूर्याच्या दिशेने झेपावेल.

Indian Air Force Day 2024
Indian Air Force Day 2024: ती काळरात्र, १२१ नागरिक ..हातात फक्त दीड तास आणि भारतीय हवाईदलाचे शौर्य; काय घडलं होतं नेमकं?
17th October Rashi Bhavishya In Marathi
१७ ऑक्टोबर पंचांग: धनसंपत्ती की प्रचंड यश, गुरुवारी…
40000 crores investment china marathi news
चिनी अर्थव्यवस्थेची उभारी भारताच्या शेअर बाजाराच्या मूळावर; सलग सहा सत्रातील घसरणीत ४०,००० कोटींच्या गुंतवणुकीचे चीनकडे वळण
All Women Service Centre by Schwing Stetter
Schwing Stetter : आता सिमेंट मिक्सरची पिवळी यंत्रे महिला दुरुस्त करणार; वाचा कोणत्या कंपनीने घेतला निर्णय, नेमका प्रयोग काय?
How Did British Rule Impact Indian Textile
World Cotton Day 2024: भारतीय वस्त्रोद्योगाला ब्रिटिशांनी लावला सुरुंग; नेमके काय घडले?
Phanindra Sama Success Story
Success Story: पाच लाखांच्या गुंतवणुकीतून सुरू केला व्यवसाय अन् मेहनतीच्या जोरावर उभे केले तब्बल सात हजार करोड
IND vs BAN Rohit Sharma Surprising Reaction Video Viral on Akashdeep Wicket DRS
IND vs BAN: सरप्राईज, सरप्राईज…, आकाशदीपची भेदक गोलंदाजी अन् परफेक्ट निर्णय, रोहित शर्माही झाला अवाक्, पाहा VIDEO
iit Mumbai tech fest
आयआयटी मुंबई ‘टेकफेस्ट’ : मुंबई विभागीय प्राथमिक फेरी ६ ऑक्टोबरला, नाव नोंदणी सुरू

राष्ट्रीय अंतराळ संस्थेने नागरिकांना आदित्य एल-१ चे प्रक्षेपण पाहण्यासाठी आमंत्रित केलं आहे. नागरिकांना याचं थेट प्रक्षेपण पाहण्यासाठी https://lvg.shar.gov.in/VSCREGISTRATION/index.jsp या लिंकवर नोंदणी करावी लागेल. SDSC-SHAR, श्रीहरिकोटा येथील लॉन्च व्ह्यू गॅलरीतून हे प्रक्षेपण लोकांना पाहता येणार आहे. ISRO ने द्वीट करत नागरिकांना प्रक्षेपण पाहण्यासाठी आमंत्रित केलं आहे.

हे ही वाचा >> Aditya L1 सूर्याच्या दिशेने झेपावण्यासाठी सज्ज, आज पूर्ण झाला महत्त्वाचा सराव

इस्रो ‘एल १’ च्या अभ्यासासाठी अवकाशयान पाठवणार आहे. ‘एल-१’ हा सूर्य आणि पृथ्वीच्या मधील एक बिंदू आहे. तिथपर्यंत हे यान जाणार आहे. हा बिंदू पृथ्वीपासून १५ लाख किलोमीटर दूर आहे. म्हणजेच आदित्य एल-१ यान तब्बल १५ लाख किलोमीटर दूर जाणार आहे. पूर्णपणे भारतीय बनावटीचं हे अवकाशयान सूर्याच्या दिशेने पाठवून सूर्याच्या भोवतालाची परिस्थिती आणि इतर संशोधन केलं जाईल. आवरणाचा, म्हणजेच कोरोनाचा अभ्यास करण्यासाठी या यानामध्ये सात वेगवेगळी उपकरणे बसवण्यात आली आहेत. यासाठी अवकाशयानाबरोबर ७ वेगवेगळे पेलोड पाठवले जातील. इस्रो या मोहमेद्वारे सौरवादळं आणि त्याचा अवकाशातील हवामानावर होणारा परिणाम याचा अभ्यास करणार आहे.