भारताची चांद्रयान-२ ही महत्त्वाकांक्षी मोहीम पुन्हा लांबणीवर पडली असून ती आता जानेवारीपर्यंत तरी होण्याची शक्यता नाही, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

भारतीय अवकाश संशोधन संस्थेला (इस्रो) या वर्षी दोन वेळा अपयश आल्यानंतर आता या ऑक्टोबरमध्येही ही मोहीम होण्याची शक्यता नाही. सुरुवातीला चांद्रयान-२ एप्रिलमध्येच पार पाडण्याचे जाहीर करण्यात आले होते. पण इस्रोचा जीसॅट ६ ए हा लष्करी संदेशवहन उपग्रह सोडण्यात आला आणि नंतर त्याच्याशी संपर्कच तुटला, त्यामुळे तो वाया गेला. त्यानंतर फ्रेंच गयानातील कोअरू येथून जीसॅट ११ या उपग्रहाचे उड्डाण होणार होते. पण तेही मागे घेण्यात आले. गेल्या सप्टेंबरमध्ये पीएसएलव्ही सी ३९ प्रक्षेपकाच्या मदतीने आयआरएनएसएस १ एच हा उपग्रह सोडण्यात आला. पण उष्णतारोधक आवरण न उघडल्याने तो अपयशी ठरला. इस्रोने त्यानंतर सावध भूमिका घेतली असून दोन अपयशांमुळे चांद्रयान-२ मोहीम लांबणीवर टाकली आहे.

Two rickshaws collided after minor driver lost control of tempo
अल्पवयीन चालकाचे टेम्पोवरील नियंत्रण सुटल्याने दोन रिक्षांना धडक
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
cm devendra fadnavis address party workers at bjp state convention
सत्तेमुळे सुखासीन झाल्यास जनतेशी द्रोह ठरेल! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे परखड मतप्रदर्शन
shivsena marathi news
पुण्यात भाजपच्या खेळीने शिवसेनेच्या दोन्ही गटांत अस्वस्थता
Ravindra Chavan responsibility BJP state president post
भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी रवींद्र चव्हाण यांना प्रतीक्षा
Local villagers experienced thrill fight between two tigers in Wasada Makta area
‘त्या’ दोन वाघांमध्ये झुंजीचा थरार; रक्ताचा सडा, पण…
tarkteerth Lakshman Shastri Joshi
तर्कतीर्थ विचार : ‘गुरुकुल’चे दिवस
loksatta readers response
लोकमानस : ‘महाराष्ट्र थांबल्या’चा साक्षात्कार कधी?

चांद्रयान-१ व मंगळयान या मोहिमा यशस्वी केल्यानंतर आता इस्रोची ही तिसरी मोहीम अपेक्षित होती. एका अधिकाऱ्याने सांगितले, की आता आम्ही कोणतीही जोखीम घेणार नाही. चांद्रयान  पाठवण्यासाठी काही सुयोग्य कालावधी आहेत. पण पुढील वर्षी जानेवारीपर्यंत तरी चांद्रयान-२ सोडले जाण्याची शक्यता कमी आहे. एप्रिलमध्ये इस्रोचे प्रमुख सिवान यांनी  सांगितले होते, की चांद्रयान-२ चे उड्डाण आम्ही ऑक्टोबर व नोव्हेंबपर्यंत लांबणीवर टाकत असल्याचे सरकारला कळवले आहे. मोहिमेच्या राष्ट्रीय समितीने चांद्रयान-२ मोहिमेचा फेरआढावा घेऊन अधिक चाचण्या करण्याची सूचना केली आहे.

चांद्रयान-२ मोहीम

चांद्रयान-२ मोहिमेत भारत प्रथमच तेथील पृष्ठभागावर रोव्हर गाडी उतरवणार असून ती भारताची दुसरी चांद्रमोहीम आहे. त्याचा खर्च ८०० कोटी रुपये असून यातील रोव्हर गाडी चंद्राच्या आतापर्यंत संशोधन न झालेल्या दक्षिण ध्रुवावर उतरवण्यात येणार आहे.

अंतराळ स्पर्धेत इस्रायल पुढे जाण्याची शक्यता

गेल्या महिन्यात इस्रायलने चंद्रावर यान पाठवण्याची योजना जाहीर केली. सर्व काही योजनेनुसार घडले तर १३ फेब्रुवारी २०१९ रोजी इस्रायलचे यान चंद्रावर उतरेल. अमेरिकी अंतराळ उद्योजक इलॉन मस्क यांच्या स्पेसएक्स या कंपनीच्या प्रक्षेपकावरून हे यान सोडण्यात येईल. ते चंद्राच्या चुंबकीय क्षेत्राचा अभ्यास करेल. आजवर अमेरिका, रशिया आणि चीनने चंद्रावर याने पाठवली आहेत. चौथे स्थान पटकावण्यासाठी भारत आणि इस्रायलमध्ये स्पर्धा आहे. भारताची मोहीम लांबणीवर गेल्याने या स्पर्धेत इस्रायल बाजी मारण्याची शक्यता आहे.

Story img Loader