चंद्रावर मॅगनिज आणि क्रोमियम या मुलद्रव्यांचे अस्तित्व चांद्रयान -२ यानाने शोधले आहे. या मुलद्रव्यांचे प्रमाण नगण्य स्वरुपात आहे. चांद्रयान -२ मोहिमेला दोन वर्ष पुर्ण झाल्याच्या निमित्ताने भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्त्रोने ‘ल्युनर सायन्स वर्कशॉप’ चे आयोजन केले होते. यावेळी या शोधाबद्द्ल माहिती देण्यात आली. चांद्रयान -२ हे चंद्राभोवती १०० किलोमीटर उंचीवर फिरत असून त्यावरील वैज्ञानिक उपकरणांच्या माध्यमातून आणखी पुढील काही वर्षे नवीन माहिती मिळत राहील असा विश्वास इस्त्रोचे अध्यक्ष डॉ के सीवन यांनी यावेळी व्यक्त केला. चांद्रयान -२ ने चंद्राभोवती ९००० प्रदक्षिणा पूर्ण केल्या असल्याचंही यावेळी जाहिर करण्यात आलं.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in