श्रीहरिकोटा : भारतीय अंतराळ संशोधन संस्था, ‘इस्रो’च्या अत्यंत महत्त्वाकांक्षी ‘चंद्रयान-३’ मोहिमेचे २५.३० तासांची उलटगणती गुरुवारी सुरू झाली. आज, शुक्रवारी दुपारी २.३५ वाजता ‘एलव्हीएम३-एम४’ या प्रक्षेपणयानाच्या मदतीने चंद्रयान झेपावेल. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी अनेक वैज्ञानिक संस्था तसेच शाळांनी थेट प्रक्षेपणाची व्यवस्था केली आहे.

२०१९साली चंद्रयान-२ मोहिमेमध्ये ‘विक्रम’ या लँडरचे अलगद अवतरण करण्याचा प्रयत्न ‘इस्रो’ने केला होता. या लँडरसोबत चंद्राच्या पृष्ठभागावर फिरणारा ‘रोव्हर’ही धाडण्यात आला होता. मात्र लँडर चांद्रपृष्ठावर कोसळल्यामुळे ही मोहीम अंशत: यशस्वी ठरली. आता चंद्रयान-३ मोहिमेत या त्रुटी दूर करण्यात आल्याची माहिती ‘इस्रो’ने दिली आहे. ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस हा लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरविण्यात येणार आहे. वैज्ञानिकांमध्ये ‘फॅट बॉय’ म्हणून ओळखले जाणारे एलव्हीएम-३ (पूर्वीचे जीएसएलव्ही-एमकेएल-२) हे प्रक्षेपणयान अतिशय जड वस्तूमान अंतराळात घेऊन जाण्यास सक्षम आहे. आतापर्यंत प्रचंड यशस्वी ठरलेल्या या प्रक्षेपणयानाची ‘चंद्रयान-३’ ही चौथी मोहीम आहे.

Indel Money launches Rs 150 crore NCD
इंडेल मनी रोखे विक्रीतून १५० कोटी उभारणार; ६६ महिन्यांत गुंतवणुकीवर दुपटीने लाभ
Samson's disclosure about Rohit Sharma
Sanju Samson : मी फायनल खेळणार होतो पण…
SpaceX succeeds in bringing the rocket back to the launch site
विश्लेषण : रॉकेट उडाले.. फिरुनी परतले.. स्थिरावले प्रक्षेपणस्थळी! स्पेसएक्स स्टारशिपच्या अद्भुत पाचव्या चाचणीची चर्चा जगभर का?
fortified rice central government
फोर्टिफाइड तांदूळ म्हणजे काय? २०२८ पर्यंत हे तांदूळ मोफत वाटप करण्याचा निर्णय सरकारने का घेतला?
Metro 3, Aarey BKC Metro 3, Narendra Modi, mumbai,
मेट्रो ३ : आरे बीकेसी टप्प्यासाठी ५ ऑक्टोबरचा मुहूर्त ? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उपस्थिती
Ola Cab
Ola Cab Driver Mastbrate : ओला ड्रायव्हरने महिला प्रवाशाकडे बघून केलं हस्तमैथून; कंपनीला थेट पाच लाखांचा दंड!
polio cases rising in afganistan
तालिबानने पोलिओ मोहिमेला स्थगिती दिल्याने अफगाणिस्तानमध्ये विनाशकारी परिणाम? नक्की घडतंय तरी काय? भारतावरही परिणाम होणार का?
friends
वेड्या दोस्तीतील शहाणीव…

मोहिमेचे तीन मुख्य टप्पे

’यान चंद्राच्या कक्षेत स्थिरावणे

’चांद्रपृष्ठावर अलगद अवतरण (सॉफ्ट लँडिंग)

’‘लँडर’मधून रोव्हरची चांद्रपृष्ठावर सफर