भारतीय अंतराळ संशोधन संस्थेकडून (इस्रो) चांद्रयान ३ यशस्वीपणे चंद्रावर उतरल्यापासून वेळोवेळी महत्त्वाच्या अपडेट्स दिल्या जात आहेत. इस्रोने आतापर्यंत चंद्रावरील तापमानापासून रोव्हरच्या मार्गापर्यंत सर्व माहिती दिली आहे. आता इस्रोने या मोहिमेबाबतची मोठी अपडेट दिली आहे. इस्रोने रविवारी (३ सप्टेंबर) ट्वीट करत रोव्हरने दिलेलं काम पूर्ण केल्याचं सांगितलं.

इस्रोने चांद्रयान ३ मोहिमेची माहिती देताना म्हटलं, “रोव्हरने त्याला दिलेलं काम पूर्ण केलं आहे. आता त्याला सुरक्षितपणे ‘पार्क’ करण्यात आलं आहे आणि त्याचा ‘स्लीप मोड’ सक्रीय करण्यात आला आहे. एपीएक्सएस आणि एलआयबीएस पेलोड्सही बंद करण्यात आले आहेत. या पेलोड्समधील डेटा लँडरमार्फत पृथ्वीवर पाठवण्यात आला आहे.”

“सध्या बॅटरी पूर्ण चार्ज”

“सध्या बॅटरी पूर्ण चार्ज आहे. पुढील सर्योदय २२ सप्टेंबर २०२३ रोजी होणार आहे. त्यावेळी सूर्य प्रकाश पडेल अशी सोलर पॅनलची रचना करण्यात आली आहे. रिसिव्हर सुरूच आहे,” अशी माहिती इस्रोने दिली.

हेही वाचा : Chandrayaan 3 : ‘प्रज्ञान’चं चंद्रावर ‘शतक’, ‘विक्रम’कडून देखरेख, इस्रोने दिली चांद्रमोहिमेची नवी माहिती

“रोव्हर इंडियाचा चंद्रावरील राजदुत म्हणून कायम चंद्रावरच राहील”

“पुन्हा एकदा रोव्हर नव्या कामासाठी यशस्वीपणे सुरू होईल, अशी आम्हाला आशा आहे. याशिवाय हा रोव्हर चंद्रावरील भारताचा राजदुत म्हणून कायम चंद्रावरच राहील,” असंही इस्रोने नमूद केलं.

Story img Loader