ISRO Launches SSLV-D2: भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रो) SSLV-D2 नावाच्या आपल्या सर्वात लहान रॉकेटचं यशस्वी प्रक्षेपण केलं. शुक्रवारी (१० फेब्रुवारी) सकाळी ९ वाजून १८ मिनिटांनी सतीश धवन अंतराळ केंद्रातून हे लॉन्चिंग झालं. यात EOS-07, Janus-1 आणि AzaadiSAT-2 या तीन उपग्रहांचा समावेश आहे. या उपग्रहांना ४५० किमीच्या कक्षेत स्थिर केलं जाणार आहे. त्यासाठीच इस्रोने हे स्मॉल सॅटेलाइट लॉन्च व्हेईकल (SSLV-D2) लॉन्च केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लॉन्चिंगनंतर तीन उपग्रह अंतराळात स्थिरावणार

इस्रोने सांगितलं की, नवं रॉकेट १५ मिनिटांच्या उड्डाणानंतर EOS-07, Antaris ‘Janus-1 आणि SpaceKidz’s AzaadiSAT-2 हे तिन्ही उपग्रह ४५० किलोमीटर अंतरावरील गोलाकार कक्षेत स्थिरावतील आणि ही मोहीम यशस्वी होईल.

PSLV-C55 च्या प्रक्षेपणाच्या तयारीला सुरुवात

इस्रोचे प्रमुख एस. सोमनाथ म्हणाले, “या यशस्वी प्रक्षेपणानंतर आम्ही PSLV-C55 ची तयारी करत आहोत. हे प्रक्षेपण NSIL साठी असेल आणि मार्चअखेर लॉन्च होईल.”

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Isro launch small satellite launch vehicle sslv d2 successfully from sriharikota pbs
Show comments