अवकाशात मानव पाठवण्याच्या महत्त्वाकांक्षी योजनेच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकत भारताने गुरुवारी यशस्वीरीत्या मानवविरहित अवकाश कुपी वातावरणात जास्त उंचीवर पाठवली. भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) जीएसएलव्ही मार्क ३ या सर्वात जड उपग्रह प्रक्षेपकाच्या साह्याने हा प्रयोग यशस्वी करत देशाच्या अवकाश संशोधनात मैलाचा दगड गाठला.
श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अवकाश केंद्राच्या दुसऱ्या क्रमांकाच्या प्रक्षेपण तळावरून गुरुवारी सकाळी
वातावरणातील जास्त उंची गाठून परतलेली ‘केअर’ अंदमान व निकोबार बेटांच्या दक्षिणेकडील टोक असलेल्या इंदिरा पॉइंटपासून १८० किमी अंतरावरील समुद्रात पडली. ‘अवकाश कुपीकडून आम्हाला सिग्नल मिळाला असून भारतीय तटरक्षक दलाचे जहाज ती कुपी आणत आहे,’ अशी माहिती ‘इस्रो’च्या मानवी अवकाशउड्डाण कार्यक्रमाचे प्रकल्प संचालक एस. उन्नीकृष्णन नायर यांनी दिली. ही अवकाश कुपी आता चेन्नईजवळील एन्नोर येथील कमराजर बंदरात आणली जाईल व तेथून ती केरळातील थिरुवनंतपुरम येथील विक्रम साराभाई अंतराळ केंद्रात आणून त्यावर अभ्यास केला जाणार आहे.
गुरुवारच्या प्रक्षेपणाने अवकाशात मानव पाठवण्याच्या भारताच्या महत्त्वाकांक्षेला बळ दिले आहे. मानवी अवकाशयान पाठवण्यात अजून दहा वर्षे प्रतीक्षा करावी लागणार आहे. मात्र अवकाशात मानवाला यशस्वीपणे परत आणण्याच्या प्रयोगातील हा मैलाचा दगड आहे. अवकाशकुपीच्या माध्यमातून अवकाशवीरांना २०२५ पर्यंत अवकाशात पाठवता येईल. ही अवकाशकुपी वातावरणातील १६०० अंश सेल्सियस तापमानाला टिकाव धरू शकते हे स्पष्ट झाले आहे.
*आजचा दिवस भारतीय अवकाश कार्यक्रमाच्या इतिहासातील महत्त्वाचा दिवस आहे. आजच्या प्रक्षेपणामुळे आपण चार टन वजनापर्यंतचे उपग्रह अवकाशात सोडू शकू. दहा वर्षांपूर्वी एलव्हीएम मार्क ३ (जीएसएलव्ही मार्क ३) हा प्रक्षेपक तयार करण्याची तयारी सुरू केली होती, त्याचे हे प्रायोगिक उड्डाण यशस्वी झाले आहे.
के. राधाकृष्णन, इस्रोचे अध्यक्ष
मानवी अवकाश मोहिमेकडे पाऊल
अवकाशात मानव पाठवण्याच्या महत्त्वाकांक्षी योजनेच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकत भारताने गुरुवारी यशस्वीरीत्या मानवविरहित अवकाश कुपी वातावरणात जास्त उंचीवर पाठवली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 19-12-2014 at 07:30 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Isro launches indias biggest rocket gslv mark iii from sriharikota