आयआरएनएसएस १ डी या भारताच्या  चौथ्या दिशादर्शक उपग्रहाचे उड्डाण ९ मार्चला होणार होते, परंतु ते तांत्रिक कारणास्तव लांबणीवर टाकण्यात आले आहे.
 उपग्रहाच्या दूरसंदेशवहन ट्रान्समीटरमध्ये दोष आढळून आल्याने उड्डाण लांबणीवर टाकण्यात आल्याचे भारतीय अवकाश संशोधन संस्थेने म्हटले आहे. पीएसएलव्ही सी २७ या प्रक्षेपकाने हा उपग्रह आंध्र प्रदेशातील श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अवकाश केंद्रावरून सोडण्यात येणार आहे.
इस्रोने फेसबुक पेजवर म्हटले आहे की, उपग्रहाची तपासणी करण्यात आली असता त्याच्या ट्रान्समीटरमध्ये बिघाड दिसून आला. आता पुढील तपासणीसाठी या उपग्रहाचे उड्डाण लांबणीवर टाकले आहे. नवीन तारीख अजून जाहीर करण्यात आलेली नाही. या उपग्रहामुळे ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीममध्ये भारत अमेरिकेची बरोबरी करणार आहे. आयआरएनएसएस १ डी हा इस्रोच्या दिशादर्शक उपग्रह प्रणालीतील चौथा उपग्रह आहे. इंडियन रिजनल नॅव्हीगेशन सॅटेलाईट सिस्टीम असे या प्रणालीचे नाव आहे. दिशादर्शन प्रणाली चालवण्यासाठी चार उपग्रह पुरेसे असून त्यामुळे अचूकतेने स्थाननिश्चिती करण्यात येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा