चांद्रयान ३ अवकाशात झेपावलं त्यावेळी झालेल्या काऊंटडाऊनला ज्या महिला शास्त्रज्ञाचा आवाज लाभला होता, त्यांचे निधन झाले आहे. एन. वलरमथी असं त्यांचं नाव असून हृदयविकाराच्या झटक्याने शनिवारी रात्री त्यांचं निधन झालं. इस्रोच्या अनेक प्रकल्पांच्या उड्डाणांच्या काऊंटडाऊनला एन. वलरमथी यांचा आवाज लाभला होता. हाच आवाज आता अवकाशात विसावला आहे. वयाच्या ६४ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

श्रीहरीकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटरमधून चांद्रयान ३ चे १४ जुलै रोजी उड्डाण झालं. तर,२३ ऑगस्ट रोजी चांद्रयान ३ चं लॅन्डर मोड्युल विक्रम लॅन्डर आणि प्रज्ञान रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागावर पोहोचलं. चंद्राच्या पृष्ठभागावर पोहोचलेला भारत हा देशातील चौथा देश ठरला आहे. तसंच, चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचलेला भारत हा पहिला देश ठरला आहे. दरम्यान, चांद्रयानाचे प्रक्षेपण झाले तेव्हा काऊंटडाऊन करण्यात आला होता. या काऊंटडाऊनला ज्या महिलेचा आवाज होता त्यांचं निधन झालं आहे.

Amit Shah left public meeting after five minutes due to fear of helicopter couldnt fly after 6 pm
हेलिकॉप्टर उडणार नाही ही भीती; पाच मिनिट अन् गृहमंत्री अमित शहा सभा सोडून…
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Shani gochar 2025
पुढील १३४ दिवसांचा काळ कमावणार बक्कळ पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार प्रत्येक कामात यश
Nagpur Kolkata bomb threat
आकाशात झेपावलेल्या विमानात बॉम्ब ठेवल्याचा फोन अन्…
article pay tribute to world renowned mridangam scholar varadarao kamalakara rao
व्यक्तिवेध : व्ही. कमलाकर राव
Sun Planet Transit In Scorpio
५ दिवसांनंतर सुर्य करणार मंगळाच्या घरात प्रवेश, या राशींचे सुरु होणार चांगले दिवस, प्रत्येक कामात मिळणार यश!
Gold seized Mumbai airport, Mumbai airport,
मुंबई विमानतळावरून पावणेतीन कोटींचे सोने जप्त, दोन कर्मचाऱ्यांना अटक

हेही वाचा >> “रोव्हरने त्याला दिलेलं काम पूर्ण केलं, आता त्याला…”; इस्रोकडून चांद्रयान ३ ची मोठी अपडेट

ISRO चे माजी संचालक डॉ. पीव्ही वेंकीटाकृष्णन यांनी ट्वीटरवर त्यांच्या निधानाची माहिती दिली. “श्रीहरिकोट्टा येथून इस्रोच्या भविष्यातील मोहिमांच्या काउंटडाउनसाठी वलरमथी मॅडमचा आवाज येणार नाही. चांद्रयान 3 ही तिची अंतिम काउंटडाउन घोषणा होती. अनपेक्षित निधन. खूप वाईट वाटते. प्रणाम!”, असं डॉ वेंकीटाकृष्णन म्हणाले.

एन. वलरमथी कोण?

फायनान्शिअल एक्स्प्रेसने हिंदुस्तान टाईम्सच्या अहवालानुसार दिलेल्या माहितीनुसार, वलरमथी यांचा जन्म ३१ जुलै १९५९ रोजी झाला आणि १९८४ मध्ये त्या इस्रोमध्ये सामील झाल्या. त्यांनी अनेक मोहिमांमध्ये भाग घेतला आणि RISAT-1 या पहिल्या स्वदेशी-विकसित रडार इमेजिंग उपग्रह (RIS) आणि भारताचा प्रकल्प संचालक म्हणून काम केले. १५ ऑगस्ट २०१५ रोजी त्यांना प्रतिष्ठित अब्दुल कलाम पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं. हा पुरस्कार मिळणाऱ्या त्या पहिल्या महिला होत्या.

हेही वाचा >> चांद्रयान 3, आदित्य L-1 मिशनच्या शास्त्रज्ञांचा पगार किती? ISRO चे शेफ, ड्रायव्हर किती कमावतात? पाहा तक्ता

चांद्रयान ३ चे अपडेट काय?

दरम्यान, भारतीय अंतराळ संशोधन संस्थेकडून (इस्रो) चांद्रयान ३ यशस्वीपणे चंद्रावर उतरल्यापासून वेळोवेळी महत्त्वाच्या अपडेट्स दिल्या जात आहेत. इस्रोने आतापर्यंत चंद्रावरील तापमानापासून रोव्हरच्या मार्गापर्यंत सर्व माहिती दिली आहे. आता इस्रोने या मोहिमेबाबतची मोठी अपडेट दिली आहे. इस्रोने रविवारी (३ सप्टेंबर) ट्वीट करत रोव्हरने दिलेलं काम पूर्ण केल्याचं सांगितलं.

इस्रोने चांद्रयान ३ मोहिमेची माहिती देताना म्हटलं, “रोव्हरने त्याला दिलेलं काम पूर्ण केलं आहे. आता त्याला सुरक्षितपणे ‘पार्क’ करण्यात आलं आहे आणि त्याचा ‘स्लीप मोड’ सक्रीय करण्यात आला आहे. एपीएक्सएस आणि एलआयबीएस पेलोड्सही बंद करण्यात आले आहेत. या पेलोड्समधील डेटा लँडरमार्फत पृथ्वीवर पाठवण्यात आला आहे.”

“सध्या बॅटरी पूर्ण चार्ज आहे. पुढील सर्योदय २२ सप्टेंबर २०२३ रोजी होणार आहे. त्यावेळी सूर्य प्रकाश पडेल अशी सोलर पॅनलची रचना करण्यात आली आहे. रिसिव्हर सुरूच आहे,” अशी माहिती इस्रोने दिली.