किंमत अवघी सव्वा लाख पण अजून प्रायोगिक पातळीवर
अग्निबाण तंत्रज्ञान मोडलेली मने जोडू शकत नाही हे खरे असले तरी हृदय प्रत्यारोपणात मात्र त्याचा उपयोग होऊ शकतो. भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजे इस्रोच्या वैज्ञानिकांनी केलेल्या संशोधनाचा उपयोग वैद्यकीय क्षेत्रात होणार आहे. भारतीय अग्निबाण विकसन प्रणालीत जे तंत्रज्ञान वापरले जाते त्याच्या मदतीने कृत्रिम हृदय तयार करता येऊ शकते. या हृदयाच्या चाचण्या प्राण्यांवर झालेल्या आहेत. इस्रोच्या वैज्ञानिकांनी अवकाश यंत्रज्ञानाचा वापर करून हे हृदय तयार केले आहे. अग्निबाणात जे हलके संमिश्र वापरले जातात त्यांचा वापर यात केला जातो त्यामुळे मानवी हृदयाला रक्ताचे पंिपग करणे सोपे बनते. मरणासन्न रुग्णांना त्यामुळे जीवदान मिळते यात शंका नाही. लेफ्ट व्हेनट्रिकल असिस्ट डिव्हाइस असे या छोटय़ा विद्युत उपकरणाचे नाव असून त्याच्या मदतीने मिनिटाला ३-५ लिटर रक्त पंप केले जाते असे इस्रोचे अध्यक्ष किरणकुमार यांनी सांगितले. हृदयातील नसíगक पंिपग क्षमता संपली असेल तर हे उपकरण वापरता येते. हा पंप स्वदेशी बनावटीच्या बॅटरीवर चालणारा आहे. त्यात लिथियम आयन सेल बॅटरी वापरली आहे. हा पंप १०० ग्रॅम वजनाचा असून तो शरीरात बसवता येतो पण त्यासाठी बॅटरी लागते. ती शरीराबाहेर असते. टिटॅनियम पासून बनवलेले असल्याने हे उपकरण शरीरात स्वीकारले जाते असे विक्रम साराभाई स्पेस सेंटरचे संचालक के. सिवन यांनी सांगितले.
तिरूअनंतपुरम येथे हा हृदयाचा पंप सुरू करण्यात आला असून त्यात अग्निबाणात वापरलेले टिटॅनियमचे संमिश्र वापरले आहे, या पंपाची चाचणी सहा प्राण्यांवर सहा तास झालेली आहे व त्यात काही समस्या निर्माण झालेल्या नाहीत. सेंट्रीफ्युगल पंपाच्या मदतीने हे यंत्र रक्त पंप करते, त्याचे प्रत्यारोपण डुकरात केले असता हे यंत्र सलग सहा तास काम करीत असल्याचे स्पष्ट झाले आहे. पण अजून त्यावर काम चालू आहे. हृदयाचा पंप आयात केला तर त्याला कोटय़वधी रुपये लागतात. हा भारतीय पंप इस्रोने सव्वा लाखात तयार केला आहे.
स्टॅनफर्डचे प्राध्यापक बलराम भार्गव यांनी सांगितले की, असा पंप भारतात कुणी अजून तयार केलेला नाही हे खरे आहे, पण त्याचा वापर अगदी मर्यादित कारणांसाठी होऊ शकतो, बारा वैज्ञानिकांच्या चमूने हा पंप सहा वर्षांत तयार केला आहे व शक्तिशाली लिथियम बॅटरीही तयार केली असून तिचा उपयोग हृदयाच्या पंपाबरोबर प्रदूषण नियंत्रण साधनातही करता येईल, पण या बॅटरीचा आकार कमी करावा लागणार आहे.