चांद्रयान ३ ही भारताची महत्वकांक्षी मोहीम आहे. याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागलं आहे. शनिवारी चांद्रयानाने चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला आहे. चांद्रयान चंद्राभोवतीच्या १७०x४३१३ या कक्षेत फिरत आहे. ९ ऑगस्टला चांद्रयान पुढील कक्षेत प्रवेश करेल, अशी माहिती इस्रोने दिली आहे.

१४ जुलैला इस्रोच्या चांद्रयान ३ ने चंद्राकडे झेपावलं होतं. पृथ्वीच्या कक्षेत फेरीत मारल्यानंतर ५ ऑगस्टला चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला आहे. ९ ऑगस्टला चांद्रयान आणखी आतल्या कक्षेत ढकललं जाईल. १७ ऑगस्टला चांद्रयान चंद्रापासून १०० किलोमीर उंचीवर स्थिरावेल. नंतर २३ ऑगस्टला चांद्रयान चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्याचा प्रयत्न करणार आहे.

13 December Daily Horoscope in Marathi
१३ डिसेंबर पंचांग: पंचांगानुसार शिवयोग १२ पैकी कोणत्या राशीची आर्थिक घडी सुधारणार? तुम्हाला लाभेल का भाग्याची साथ; वाचा शुक्रवारचे भविष्य
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Shani-Mercury kendra drishti
२७ डिसेंबरपासून ‘या’ तीन राशींचे चमकणार भाग्य; शनी-बुधाची केंद्र दृष्टी देणार भरपूर पैसा
Mangal Rashi Parivartan 2024
४२ दिवसानंतर नुसता पैसा; मंगळाच्या राशी परिवर्तनाने ‘या’ तीन राशीच्या व्यक्ती होणार भाग्यवान
Shukra Nakshatra parivartan 2024
उद्यापासून पडणार पैशांचा पाऊस; शुक्राच्या नक्षत्र परिवर्तनाने ‘या’ तीन राशींना होणार भौतिक सुखाची प्राप्ती
Rahu Gochar 2025
Rahu Gochar 2025 : राहु बदलणार चाल, पडणार पैशांचा पाऊस! ‘या’ तीन राशींचे चमकणार भाग्य
shukra guru make navpancham yog
नवपंचम राजयोग देणार पैसाच पैसा; ‘या’ तीन राशींवर शुक्र-गुरूची होणार कृपा
Mangal Vakri 2025
मंगळ देणार पैसा, प्रेम अन् प्रसिद्धी; नव्या वर्षाच्या सुरूवातीला ‘या’ तीन राशींना मिळणार प्रत्येक कामात यश

हेही वाचा : चांद्रयानासारख्या अवकाश मोहिमांनी असं बदललं आपलं रोजचं आयुष्य…

दरम्यान, इस्रोने रविवारी चांद्रायानाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत चंद्रावरील पृष्ठभाग स्पष्टपणे दिसत आहे. चांद्रयान ३ ही भारताची चंद्राच्या अध्ययनासाठी पाठवलेली तिसरी मोठी मोहीम आहे. यापूर्वी पहिल्या मोहीमेत यश आलं होतं. तर दुसऱ्या मोहीमेत विक्रम लँडरचा अपघात झाल्याने अपयश आलं होतं.

Story img Loader