पावसाळ्याआधी इस्रोचा महत्त्वाकांक्षी उपक्रम; भारताचा पहिलाच प्रयत्न
पावसाळा सुरू होण्यापूर्वी भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजे इस्रो फेरवापराचे स्पेसशटलसारखे अवकाशयान सोडणार आहे. भारताचा या क्षेत्रातील हा पहिलाच प्रयत्न असणार आहे. आंध्र प्रदेशातील श्रीहरीकोटातून हे रियूजेबल लाँच व्हेइकल सोडले जाणार असून त्यात फेरवापराच्या तंत्रज्ञानातील भारताची क्षमता सिद्धता स्पष्ट होणार आहे. या स्पेसशटलसारख्या वाहनाचा वापर फेरवापरासाठी होणार असून एकदा सोडल्यानंतर ते परत बंगालच्या उपसागरातील प्रदेशात परत येणार आहे. पृथ्वीच्या वातावरणात सुखरूपपणे परत येण्याची या अवकाशवाहनाची क्षमता तपासली जाणार आहे. या प्रयोगाचे नाव हायपरसॉनिक एक्सपिरिमेंट असे आहे. सध्या हे वाहन स्पोर्ट्स युटिलिटी व्हेईकल म्हणजे एसयूव्हीच्या वजनाएवढे व आटोपशीर असेल त्याला श्रीहरीकोटा येथे अंतिम रूप दिले जात आहे. इस्रोच्या मते या फेरवापराच्या अवकाशयानाचा प्रयोग यशस्वी झाल्यास खíचक उड्डाणांचा पसा वाचणार आहे. नेहमीच्या उड्डाणांवर दहा पट पसा खर्च होत असतो. विक्रम साराभाई स्पेस सेंटर या तिरूअनंतपूरम येथील संस्थेचे संचालक. के शिवन यांनी सांगितले की, हे लहान बाळ असले तरी ते मोठी झेप घेण्यास सज्ज आहे.
हे मेड इन इंडियामधील वाहन असून ते वापरानंतर समुद्रात येऊन पडेल व त्याचे तुकडे वेगळे होतील कारण ते तरंगण्याच्या क्षमतेचे नाही. ते तरंगावे अशी अपेक्षा यात नाही तर बंगालच्या उपसागरातील किनाऱ्यापासून ५०० कि.मी दूर असलेल्या धावपट्टीवरून घसरत आवाजाच्या वेगापेक्षा पाच पट अधिक वेगाने घसरत जाण्याची क्षमता त्यात असणार आहे. अमेरिकी स्पेस शटलमध्ये घडते तसेच यात घडणे अपेक्षित आहे. सध्या त्याचा आकार अंतिम रूपापेक्षा सहा पट कमी आहे. अंतिम प्रारूप तयार होण्यास अजून १० ते १५ वष्रे लागण्याची शक्यता आहे, कारण मानवाला अवकाशात नेऊन परत आणणारे वाहन तयार करणे म्हणजे पोरखेळ नक्कीच नाही. स्पेस शटल तंत्रज्ञानात अमेरिकेने याआधी यश मिळवले असून त्यांनी स्पेस शटलची १३५ उड्डाणे केली. त्यानंतर २०११ मध्ये स्पेस शटल कार्यक्रम बंद करण्यात आला असून आता रशियाच्या मदतीने अवकाशवीर अंतराळात जातात. रशियाचे बुराण नावाचे स्पेस शटल १९८९ मध्ये अवकाशात गेले, त्यानंतर फ्रान्स व जपाननेही काही प्रयोग केले. चीनने स्पेस शटलचे प्रयत्न केलेले नाहीत. पंधरा वर्षांपासून भारताने स्पेस शटल तयार करण्याचे ठरवले असून त्याचे काम पाच वर्षांपूर्वी सुरू झाले त्यात अनेक वैज्ञानिक व अभियंते काम करीत आहेत. ६.५ मीटर लांबीचे विमानासारखे स्पेस शटल हे वजनाने १.७५ टन असेल व ते विशेष रॉकेट बुस्टरने अवकाशात जाईल. त्याच्या पहिल्या टप्प्यात घन इंधन असेल. नंतर ते यान वातावरणापासून ७० कि.मी उंचीवर जाईल. नंतर उतरताना नॅव्हीगेटरचा (दिशादर्शक) वापर करून ते कुठे उतरवायचे हे ठरेल व ग्लायडरच्या मदतीने ते उतरेल. त्यावर जहाजे, उपग्रह व रडार यांच्या माध्यमातून लक्ष ठेवले जाईल. सध्याच्या आवृत्तीत त्यात कुठलेही सामान असणार नाही. काही खासगी अब्जाधीशांनी नासाच्या मदतीने खासगी व्हर्टकिल लिफ्ट ऑफ व व्हर्टकिल लँिडग अवकाशयाने तयार केली असून स्पेस एक्स या कंपनीचे एलन मस्क यांनी फाल्कन रॉकेटच्या मदतीने हा प्रयोग केला. त्यानंतर जेफ बेझोस यांच्या ब्लू होरायझनचे न्यू शेफर्ड रॉकेट टेक्सासमध्ये उतरू शकले.
भारतीय स्पेस शटल आरएलव्ही टीडी तयार करण्याचे काम पाच वर्षांपूर्वी सुरू झाले असून त्यासाठी ९५ कोटी रुपये खर्च आला आहे. अत्यंत उच्च तापमानाला टिकू शकतील असे पदार्थ तयार करणे हे व्हीएसएससीपुढे मोठे आव्हान आहे. कारण अवकाशयान परत येताना वातावरणाच्या घर्षणाने ५ ते ७ हजार अंश सेल्सियस इतके तापत असते त्या तापमानाला कमी वजनाचे उष्णतारोधक सिलिका टाइल्स टिकू शकतात.