लाखो पर्यटकांचे आवडीचे ठिकाण असलेले इस्तंबूल शहर मंगळवारी स्फोटाने हादरले. स्फोटात आतापर्यंत दहा जणांचा बळी गेला असून, १५ जण जखमी झाले असल्याची माहिती मिळाली आहे. इस्तंबूलच्या मध्यवर्ती भागातच हा स्फोट झाल्याचे तेथील सरकारने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
स्फोटामध्ये कोणत्या स्फोटकांचा वापर करण्यात आला होता, हा दहशतवादी हल्ला होता का, कोणाकडून स्फोट घडवून आणण्यात आला, याचा शोध पोलिसांकडून घेण्यात येतो आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार हा आत्मघातकी हल्ला होता.
स्फोटानंतर संपूर्ण परिसर रिकामा करण्यात आला असून, पोलिसांकडून परिसराची तपासणी करण्यात येते आहे. या भागामध्ये अजून कुठे स्फोटके ठेवण्यात आलेली नाहीत ना? याचाही शोध घेण्यात येतो आहे. निळ्या मशिदीजवळच हा स्फोट घडवून आणण्यात आला. या भागात पर्यटकांची मोठी वर्दळ असते.
तुर्कीमध्ये गेल्या वर्षी दोन मोठ बॉम्बस्फोट घडवून आणण्यात आले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा