गेल्या सात दिवसांपासून युक्रेन आणि रशियामध्ये युद्ध सुरु आहे. रशिया युक्रेनवर जोरदार हल्ले करत आहे. युक्रेनमधील अनेक शहरांमध्ये मोठमोठ्या इमारतींचे रूपांतर ढिगाऱ्यामध्ये झाले आहे. रशियन लष्कराने कीवमधील टीव्ही टॉवरही उद्ध्वस्त केला आहे. या युद्धाच्या पार्श्वभूमीवर, गेल्या काही दिवसांत अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांनी रशियापासून अंतर राखण्यास सुरुवात केली आहे. तसेच, अनेक पाश्चात्य देशांकडून रशियावर निर्बंध लादले जात आहेत. त्यामुळे रशियन कंपन्यांना या देशांमध्ये व्यवसाय करणे कठीण होणार आहे. युक्रेनसोबतचे हे युद्ध असेच सुरू राहिल्यास रशियाच्या अर्थव्यवस्थेचे मोठे नुकसान होऊ शकते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

याचदरम्यान, ट्विटरवर #IStandWithPutin हा हॅशटॅग ट्रेंड करत आहे. भारतातील एक मोठा वर्ग भारताच्या रशियासोबत असलेल्या पारंपरिक मैत्रीचा दाखला देत रशियाला समर्थन देत आहे. लोकांचे असे म्हणणे आहे की अमेरिका संधीसाधू आहे. आजवर त्यांनी संधी पाहूनच कोणाशी मैत्री करायचे हे ठरवले आहे. तर रशिया हा आपला खरा साथीदार आहे. त्यांनी भारताला प्रत्येकवेळी साथ दिली आहे.

पुतिन यांचं युक्रेननंतरचं टार्गेट ठरणार ‘हा’ देश; बेलारुसच्या राष्ट्रपतींनी चुकून उघड केलं गुपित

खेळांमधून हद्दपार केल्यानंतर आता मनोरंजन बंदी!; रशियासंदर्भात Disney, Sony Picturesचा मोठा निर्णय

Russia-Ukraine War : रशिया-युक्रेन युद्धाच्या दरम्यान का होतेय व्लादिमीर पुतिन यांच्या टेबलची चर्चा?

ट्विटरवर #IStandWithPutin या हॅशटॅगचा जणू पूरच आला आहे. लोक सातत्याने या हॅशटॅगचा वापर करून वेगवेगळ्या तथ्यांच्या आधारे रशिया हाच भारताचा खरा मित्र असल्याचे सांगत आहे. यासोबतच नेटकरी अनेक मिम्स आणि कार्टूनसुद्धा शेअर करत आहेत. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की हे अमेरिकेच्या फसवणुकीचे बळी ठरले असून शंभरपट बलाढ्य रशियाशी लढण्यासाठी युक्रेनला एकट्यालाच पुढे केले आहे असे एका यूजरने म्हटले आहे. त्याचप्रमाणे इतर देशांतील युद्धाचा संदर्भ देत लोकांनी अमेरिकेचा खरा चेहरा सांगण्याचा प्रयत्न केला आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Istandwithputin is trending on twitter netizens calling us an opportunist russia india friendship pvp